महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतकार्यात सामील झालेल्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस रूपात भेट, आयुक्त प्रवीण परदेशी यांचा निर्णय

मागील दोन आठवड्यांपासून महाराष्ट्रात कोल्हापूर (Kolhapur) , सांगली (Sangali)  परिसरात पावसामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली होती, यामध्ये लाखो सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. पुरात अडकलेल्या जनतेला सोडवण्यासाठी सैन्य (Indian Army), नौदल (Indian Navy), एनडीआरएफ (NDRF)  सारख्या अनेक गटांनी प्रयत्नानांची शर्थ लावली होती. या भागातील जनजीवन आता पूर्वपदावर येत असताना मुंबई महापालिकेचे (BMC)  कर्मचारी देखील दिवसरात्र मेहनत करत आहेत. या गरजूंच्या मदतीसाठी धावून आलेल्या कर्मचाऱ्यांना आपल्या सेवाभावाचा मोबदला म्ह्णून आता मुंबई महापालिका मुख्य आयुक्त प्रवीण परदेशी (Pravin Pardeshi) यांनी नवीन निर्णय घोषित केला आहे. यानुसार मदतकार्यातील कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येणार असल्याचे समजत आहे.

प्राप्त माहितीनुसार,काही दिवसांपासून कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांची मोठी तुकडी कार्यरत आहे. यामध्ये 50 वैद्यकीय अधिकारी, रुग्णसेवक, कीटकनाशक विभागातील 10 अधिकारी, कामगार, मलनि:सारण खात्यातील पाच अधिकारी, नऊ कामगार, अग्निशमन दलातील चार अधिकारी आणि 16 कर्मचारी, तर घनकचरा व्यवस्थापन विभागातील 12 अधिकारी आणि तब्बल 422 सफाई कामगारांचा समावेश आहे. (आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या महापुराची दखल; 8 देशांच्या राजदूतांनी घेतली संभाजी राजे यांची भेट (Video)

दरम्यान, प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील अधिकाऱ्यांना अर्ध्या महिन्याचा , तर कर्मचारी, कामगारांना एका महिन्याचा पगार बोनस रूपात देण्यात येणार आहेत. या भागात कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्त भागात स्वछता करूनसाथीचे रोग पसरण्यापासून रोखायचे प्रयत्न आरंभले आहेत. यासोबतच या भागात शुद्ध पाणी मिळावे यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत.