BMC Monsoon SMS Alerts: मुंबईकरांना पावसाळ्यात आपात्कालीन परिस्थिती मध्ये मिळणार एसएमएस अलर्ट्स
Mobile Phone Pixabay

मुंबई (Mumbai) मध्ये काही वर्षांमध्ये कमी वेळात अधिक प्रमाणात पाऊस बरसत आहे. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्याचं प्रमाण वाढलं आहे. परिणामी अनेकांची तारांबळ उडते. पण बीएमसी (BMC) कडून आता या समस्येवर उपाय म्हणून मुंबईकरांना त्याच्या मोबाईल वर एसएमएस (SMS) च्या माध्यमातून अलर्ट्स पाठवले जाणार आहेत. बीएमसी कडून ही माहिती देण्यात आली आहे.

बीएमसी चं District Disaster Management Department कडून कंट्रोल रूम बनवली जात आहे. ज्याद्वारा मुंबईकरांना रिअल टाईम वेदर अलर्ट्स पाठवले जाणार आहेत. मंगळवारी बीएमसी कडून हे सांगण्यात आले आहे.

मुंबई मध्ये इमरजन्सी म्हणजेच आपत्कालीन परिस्थिती मध्ये नागरिकांना एसएमएस अलर्ट दिले जाणार आहेत. मनपा आयुक्त Iqbal Singh Chahalयांनी मंगळवारी एक बैठक घेतली आहे. यामध्ये मुंबई मधील अनेक एजन्सी च्या प्रमुखांचा समावेश होता. त्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट आणि आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यात आला आहे.

चहल यांच्यासोबत बैठकीमध्ये BEST, MMRDA, MSRDC, PWD, Mumbai Metro, Railways, NDRF, IMD, MHADA आणि अन्य प्रशासकीय अधिकारी होते. यावेळी चहल यांनी सार्‍या समितींनी एकमेकांशी जुळवून घेत आणि संवाद ठेवून संभाव्य आव्हानांचा मान्सूनच्या काळात सामना करावा. Rain Update: मान्सून 4 जून रोजी केरळमध्ये येण्याची शक्यता, भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज .

मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकल सुरळीत चालावी म्हणून चहल यांनी मे महिन्याच्या अखेरी पर्यंत गार्डन विभागाकडून रेल्वे रूळाच्या आसपास असलेली सारी झाडं ट्रीम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.