मुंबईच्या रस्त्यांवर गाई, बैल,घोडे यांच्या माध्यमातून अर्थाजन करणारी अनेक कुटुंबिय आहेत. मात्र अशाप्रकारे प्राण्यांना मंदिरांबाहेर किंवा रस्स्त्यांवर बांधून ठेवणं हे अमानुष आहे सोबतच प्राण्यांमुळे मुंबई शहरांमध्ये वाढणारी अस्वच्छता अनेक समस्यांना कारणीभूत ठरत असल्याने आता हा त्रास कमी करण्यासाठी गुरांना बेजबाबदारपणे सोडणार्यांना आता 10000 रूपयांचा दंड आकारण्याचा विचार मुंबई महानगर पालिकेमध्ये होत असल्याचे समोर आले आहे. माटुंगाच्या नगरसेविका नेहल शहा (Nehal Shah) यांनी याबाबत एक प्रस्ताव महापालिकेत मांडला होता.
सध्याच्या नियमांनुसार रस्त्यावर गुरं फिरताना दिसल्यास महापालिकेचे कर्मचारी त्यांना ताब्यात घेऊन खास ठिकाणी ठेवली जातात. त्यांना पुन्हा मिळवण्यासाठी मालकांना 2,500 रूपयांचा दंड होता मात्र आता त्यामध्ये 300 पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नेहला शाह यांनी महापालिकेच्या सभागृहात मांडलेल्या प्रस्तावावर आता पालिकेने सकारात्मक अभिप्राय दिला आहे. लवकरच दंडाच्या रकमेमध्ये वाढ करण्याबाबत प्रस्ताव स्थायी समितीमध्ये येणार आहे. IIT Bombay च्या वर्गात घुसला बैल, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण; प्रशासन अजूनही शांतच (Video)
नेहला शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यांवर मोकाट सोडलेल्या गुरांमुळे घाणीचं साम्राज्य पसरतं. या प्राण्यांच्या मलमूत्रामुळे दुर्गंधी पसरते. याचा परिणाम अस्वच्छतेवर होतो. सोबतच सध्या पावसाच्या दिवसामध्ये या घाणीवरून मोटारसायकलस्वारांचे अपघातही होतात.