Electric Cars (Photo Credits: File Photo)

भारतामध्ये सध्या हळूहळू इलेक्ट्रिक गाड्यांची (Electric Cars) क्रेझ वाढत आहे. मुंबई सारख्या गर्दीच्या शहरातही अनेक ठिकाणि सार्वजनिक इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचं काम सुरू झालं आहे. अशातच आता बीएमसीने (BMC) वीजनिर्मितीसाठी दक्षिण मुंबई मध्ये एक पर्यावरण पुरक उपक्रम राबवला आहे. ज्यामध्ये आसपासच्या रेस्टॉरंटमधील कचरा गोळा करून ते वीज निर्मिती करत आहेत आणि त्याच्या माध्यमातून इलेक्ट्रिक कार्सची चार्जिंग स्टेशन्स चालवणार आहेत. सध्या अशाप्रकारे निर्माण झालेल्या वीजेमधून हाजी अली परिसरातील महापालिकेच्या एका बागेतील दिवे सुरू केले जात आहेत.

बीएमसीच्या डी वॉर्ड कडून मुंबईत पहिला वहिला बायोगॅस प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे. यासाठी आसपास असणार्‍या सुमारे 30 रेस्टॉरंट मधून कचरा गोळा करून त्यामधून वीज निर्मिती होणार आहे. पालिकेच्या या प्रयत्नामधून वीज निर्मिती तर होईल पण त्यासोबतच कचर्‍याचं देखील व्यवस्थापन होणार आहे. सध्या या चार्जिंग स्टेशनवर 2 इलेक्ट्रिक कार एकावेळी चार्ज होत आहेत. लवकरच त्याची संख्या 2 वरून 6 होणार आहे. डी वॉर्ड मधील या प्लांटद्वारा प्रतिदिन 300 युनिट वीज बनवली जात आहे. त्यामुळे दिवसाला 1000 किलो कोळश्याची बचत होत असल्याची माहिती वेस्ट-टू-एनर्जी प्लांटचे नोडल ऑफिसर राजेंद्र जगताप यांनी महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना दिली आहे. नक्की वाचा: Mumbai: आता अन्न कचऱ्यापासून निर्मित विजेवर चार्ज होणार Electric Vehicles: मुंबईमध्ये उभा राहिले भारतातील पहिले चार्जिंग स्टेशन .

पहा ट्वीट

बीएमसी डी वॉर्ड प्रमाणेच हळूहळू हा प्रयोग इतर काही वॉर्डमध्येही राबवणार आहे. डी वॉर्ड चे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.