मुंबई शहर, उपनगरांत ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता
Cloudy weather | (Photo Credits-Facebook)

मान्सून हंगाम कालावधी संपल्याचे हवामान विभागाने अधिकृतपणे जाहीर केले असले तरी, अद्यापही मुंबई शहर (Mumbai City) आणि राज्यातील विविध ठिकाणी अद्यापही पावसांच्या सरी कोसळतच आहेत. मुंबई शहरातही आज (सोमवार, 7 ऑक्टोबर 2019) सायंकाळी आणि रात्री आकाश आकाश अंशतः ढगाळ राहून मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain ) पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई महापालिका (BMC) अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यंदा पावसाची दमदार हजेरी पाहायलमा मिळाली. मुंबई शहर-उपनगर, कोकण, विदर्भासहीत महाराष्ट्रातील इतरही अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. राज्यातील अनेक ठिकाणी महापूर आले. यात कोल्हापूर, सांगली, पुणे यांसह कोकण विभागाचाही समावेश आहे. कोकणात आलेल्या माहापुरामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले. तर, कोल्हापूर, सांगलीत आलेल्या पुराणे नागरिकांचे संसार वाहून गेले. शेतीचे मोठे नुकसान झाले. प्रामुख्याने ऊसाची शेती धोक्यात आली. शेतकरी, व्यापारी वर्ग यांना मोठे नुकसान पोहोचले. (हेही वाचा, जालना येथे वीज पडून तीन जणांचा मृत्यू तर सांगली, नाशिकला परतीच्या पावसामुळे झोडपल्याने स्थानिकांची तारांबळ)

मुंबई महापालिका ट्विट

दरम्यान, राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे अतोनात नुकसान झाले असले तरी, राज्यावरील दुष्काळाचे संकट हटले असे मुळीच नाही. राज्यातील अनेक ठिकाणी आजही पाण्याची मोठी समस्या पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी अगदीच तुरळक पाऊस झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात पावसाची अनियमितता पाहायला मळत आहे.