Narayan Rane यांच्या 'अधिश' बंगल्यावरून पालिकेचं पुन्हा 15 दिवसांचं अल्टिमेटम; बांधकाम न पाडल्यास कारवाई करण्याची नोटीस
Narayan Rane | (Photo Credits: Facebook)

नारायण राणे (Narayan Rane) यांचा जुहू (Juhu) येथील अधिश बंगला (Adhish) यावर कारवाई शक्यता पुन्हा वाढली आहे. राणेंच्या बंगल्यातील बेकायदा काम नियमित करण्यासाठीचा अर्ज बीएमसीने पुन्हा फेटाळला आहे. बांधकाम नियमित करणं शक्य नसल्याचं सांगत त्यांनी स्वतःच 15 दिवसात अवैध काम पाडावं अन्यथा पालिका कारवाई करेल असे नोटीसीमध्ये सांगण्यात आले आहे.

बीएमसी अधिकाऱ्यांच्या पथकाने फेब्रुवारी महिन्यात बंगल्यात पाहणी केली होती. त्यानंतर 'कारणे दाखवा' नोटिस पाठवत 15 दिवसांत अनधिकृत बांधकाम स्वत:हून पाडले नाही, तर ते पालिकेकडून तोडले जाईल आणि त्याचा खर्च वसूल केला जाईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर राणे कुटुंब न्यायालयात गेले होते.

सीआरझेड नियमाअंतर्गत चार मजल्यांची इमारत उभारण्याची परवानगी असताना आठ मजले बांधले आहेत असे पालिकेने म्हटले आहे. तसेच परवानगीपेक्षा अधिक एफएसआयचा वापर करण्यात आला आहे. सीआरझेड-यू क्षेत्रात बेसमेंट बांधण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्याचाही ठपका बीएमसीने म्हटलं आहे. हे देखील नक्की वाचा: Bmc New Notice To Narayan Rane: नारायण राणे यांना मुंबई महापालिकेची नोटीस, 'बंगल्यातील अनधिकृत बांधकाम हटवा अन्यथा कारवाई करु'.

नारायण राणे यांनी यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री, पालिका आयुक्तांना कारवाईसाठी केवळ माझंचं घर दिसतं ही कारवाई सूडबुद्धीने केली जात असल्याचं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला आहे.