BMC Recruitment 2021: मुंबई महापालिकेत प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ आणि फार्मासिस्ट या पदांसाठी भरती; उमेदवार portal.mcgm.gov.in वर करू शकतात अर्ज
File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

BMC Recruitment 2021: सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. मुंबई महानगरपालिका (MCGM) ने फार्मासिस्ट आणि लॅब टेक्निशियन या पदांवर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. उमेदवारांना महत्वाच्या तारखा, पात्रता, अनुभव, निवडीचे निकष, अर्ज कसे करावे आणि इतर माहिती एमसीजीएम रिक्रूटमेंट 2021 अधिकृत वेबसाइट portal.mcgm.gov.in वर भेट देऊन मिळू शकेल. विहित नमुन्यात अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 28 मे 2021 आहे. (वाचा - Medical Students Examinations: राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता 10 ते 30 जून दरम्यान घेण्यात येणार - अमित देशमुख)

महत्त्वाच्या तारखा -

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 मे 2021 आहे.

फार्मासिस्टसाठी 96 पदांची भरती

लॅब टेक्निशियनसाठी 89 पदांची भरती

एमसीजीएम पॅरामेडिकल वेतन:

लेबोरेटरी टेक्निशियन- - रु. 18,000/-

फार्मासिस्ट - रु. 18,000/-

एमसीजीएम पॅरामेडिकल स्टाफ पोस्टसाठी पात्रता निकष -

प्रयोगशाळा तंत्रज्ञ - बी.एस्सी मध्ये पदवी. पॅरामेडिकल तंत्रज्ञानासह डीएमएलटीसह किंवा प्रयोगशाळेतील औषधांमध्ये 12 वी

फार्मासिस्ट - डी फार्मा / बी फार्मा

एमसीजीएम पॅरामेडिकल वय मर्यादा:

18 ते 65 वर्षे

एमसीजीएम पॅरामेडिकल स्टाफ भरती 2021 साठी अर्ज कसा करावा?

पात्र उमेदवार विहित नमुन्यात 28 मे 2021 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. उमेदवार portal.mcgm.gov.in वर भेट देऊन अर्जाच्या प्रक्रियेची अधिक माहिती पाहू शकतात.