Gas Leak Smell in Mumbai: मुंबईतील चेंबूर, घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि पवई येथून संशयित गॅस गळतीच्या तक्रारी; बीएमसीकडून अग्निशमन दलाच्या माध्यमातून तपास सुरू
File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

Gas Leak Smell in Mumbai: मुंबई महानगरपालिकेकडे (BMC) चेंबूर, घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि पवई येथील रहिवाशांकडून संशयित गॅस गळती (Gas Leak) होण्याच्या काही तक्रारी आल्या आहेत. याचा अग्निशमन दल (Fire Brigade) तपास करत आहे. आम्ही लवकरचं यासंदर्भात सत्यता तपासू, असं महानगरपालिकेने म्हटलं आहे.

मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकृत ट्विट हँडलवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. यात बीएणसीने 'चेंबूर, घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि पवई परिसरात वायू गॅस गळती सदृश्य वास येत असल्याच्या काही तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. मुंबई अग्निशमन दल या संशयित गळतीचा शोध घेत आहे. योग्य माहिती मिळाल्यानंतर कळविण्यात येईल,' असं म्हटलं आहे. (हेही वाचा - Coronavirus Updates: मुंबईतील धारावीत आज COVID19 चे आणखी 10 रुग्णांची भर पडल्याने आकडा 1899 वर पोहचला, मुंबई महापालिकेची माहिती)

दरम्यान, BMC कडून नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. संशयित गॅस गळती घटनेची काळजी घेण्यासाठी 13 अग्निशामक दलाच्या गाड्या सक्रिय करण्यात आल्या आहेत. कोणाला गॅस गळतीच्या वासनामुळे त्रास होत असेल, तर त्यांनी आपल्या तोंडावर ओला टॉवेल किंवा कपडा बांधावा आणि नाक झाकून घ्यावे, अशा सुचनाही बीएमसीकडून देण्यात आल्या आहेत.