MP Navneet Rana, MLA Ravi Rana यांना BMC ची मुंबईतील घरात अवैध बांधकाम प्रकरणी नोटीस; 7 दिवसांत उत्तर न दिल्यास कारवाई करण्याचा इशारा
Navneet Rana, Ravi Rana | (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीसा म्हणण्यावरून हट्टाला पेटल्यामुळे राणा दाम्पत्याला 12 दिवसांची जेलवारी झाली. सध्या जामीनावर सुटलेल्या नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्यासमोरील अडचणी मात्र अद्याप कमी झालेल्या नाहीत. दिवसेंदिवस भर पडत चाललेल्या राणा दाम्पत्याला आता त्यांच्या खार (Khar)  मधील घराचं अवैध बांधकाम प्रकरणी मुंबई महानगरपालिकेची (BMC)  नवी नोटीस आली आहे. बीएमसी ने Municipal Corporation Act section 351(1A)अंतर्गत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना नोटीस बजावली आहे.

बीएमसीने बजावलेल्या या नोटीसीला 7 दिवसांच्या आत उत्तर मागितलं आहे. राणा दाम्पत्याने उत्तर न दिल्यास त्यांच्या घराचं अवैध बांधकाम पाडण्यास त्यांच्या परवानगीशिवाय सुरूवात केली जाईल असं सांगण्यात आले आहे.

ANI Tweet

दरम्यान रवी राणा आणि नवनीत राणा विरूद्ध शिवसेना असा संघर्ष मागील काही दिवसांपासून रंगला आहे. राणा दाम्पत्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर प्रखर शब्दांत टीका केली जात आहे. काही दिवसांपूर्वी लीलावती रूग्णालयात दाखल असताना एमआरआय दरम्यान फोटो कसे काढले जाऊ शकतात? असा सवाल शिवसेनेच्या शिष्टमंडळाने काल रूग्णालयात जाऊन त्यांच्या डॉक्टर, कर्मचारी आणि प्रशसनालाही विचारला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात आपल्याला दिल्या जाणार्‍या वागणूकीवरून दिल्लीत खासदार नवनीत राणांनी केंद्रीय पातळीवर तक्ररी नोंदवल्या आहेत. नक्की वाचा: Hanuman Chalisa Row: नवनीत राणा यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चॅलेंज; म्हणाल्या, 'माझ्याविरोधात महाराष्ट्रातल्या कोणत्याही जागेवरून निवडणूक जिंकून दाखवावी' .

नवनीत राणा, रवी राणा यांनी जामीनाच्या वेळेस घातलेल्या अटींचं उल्लंघन केल्याचा सरकारी वकिलांनी दावा केल्याने त्याबाबतची देखील नोटीस त्यांना देण्यात आली आहे.