Byculla Quarantine Centre (Photo Credits: ANI)

मुंबईत कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत मुंबईत (Mumbai) कोरोना बाधितांची एकूण संख्या 64,068 वर पोहोचली आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिली आहे. यामुळे मुंबईत रुग्णालयात जागा अपुरी पडत असून काही रुग्णांना तर घरातच क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात येत आहे. यामुळे भायखळा (Byculla) येथील Richardson&Cruddas या इंजिनीअरिंग कंपनीने आपले ऑफिस क्वारंटाईन सेंटर साठी दिले होते. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने या कंपनीत 1000 बेड्स सह क्वारंटाईन सेंटर उभारले आहे.

भायखळा मधील या इमारतीत 1000 बेड्समध्ये 300 ICU बेड्स आहेत. ज्यात ऑक्सिजन पुरवठा आणि अन्य सुविधा देण्यात आल्या आहेत. Richardson&Cruddas कंपनीत तयार करण्यात आलेले क्वारंटाईन सेंटर जूनच्या अखेरीस सुरु करण्यात येईल. Coronavirus in Maharashtra: मुंबई, पुणे, ठाणे या शहरांभोवती कोरोना व्हायरसचा वाढता विळखा; तुमच्या जिल्ह्यात कोविड-19 चे किती रुग्ण? जाणून घ्या एका क्लिकवर

पाहा फोटोज:

कोरोना बाधित रुग्णांसाठी तयार करण्यात आलेले हे सेंटर खूपच फायदेशीर ठरेल असे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.

तर महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 124331 वर पोहचला असून एकूण 5893 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तर 55651 रुग्णांवर उपचार सुरु असून 62773 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.