BMC Engineers in Bribery Case: लाच प्रकरणामध्ये बीएमसीचे 2 इंजिनिअर्सना अटक
Arrests | (Photo credit: archived, edited, representative image)

बीएमसी (BMC) च्या Building and Factory Department च्या सेकंडरी इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियरला अटक करण्यात आली आहे. एका व्यक्तीकडून 8 लाखांची लाच मागितल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो च्या पोलिस अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, 37 वर्षीय मंगेश कांबळी आणि 43 वर्षीय सूरज पवार यांनी 37 वर्षीय निलेश होडर सोबत लाच घेताना पकडले गेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल्डरला टेरेसवर बांधलेले शेड आणि त्याच्या सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरील काही बेकायदेशीर लॉफ्ट्स पाडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. हे बांधकाम थांबवण्यासाठी कांबळी आणि पवार यांनी 20 लाख रुपयांची लाच मागितली.

“तक्रारदाराला लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्यामुळे, त्याने सापळा रचून एजन्सीशी संपर्क साधला आणि दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये दोन्ही इंजिनियरच्या वतीने 8 लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना खाजगी व्यक्तीला अटक करण्यात आली. ” असे पोलीस अधिकारी म्हणाले. त्यानंतर नागरी अभियंत्यांना अटक करण्यात आली. TOI  च्या रिपोर्टनुसार, तक्रारदाराने दक्षिण मुंबईतील पाच मजली इमारतीच्या मालकीचे भागीदार असल्याचे एसीबीला सांगितले. एका भाडेकरूने पावसाळ्यात शेड बांधल्याचे सांगितले. अनधिकृत बांधकामामुळे बीएमसीने ती रिकामी करण्याची नोटीस बजावली. नोटीस संदर्भात एक मालक बीएमसी अधिकाऱ्यांना भेटायला गेला असता, टेरेसवरील बेकायदेशीर बांधकामावर कारवाई न करण्यासाठी आरोपीने 15 लाख रुपये आणि दुसऱ्या बेकायदा बांधकामासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी एसीबीकडे जाऊन तक्रार दाखल केली.