BMC Employee Promotion: वयाची पन्नाशी पार कर्मचाऱ्यांना थेट पदोन्नती, परीक्षेची अट नाही; मुंबई महापालिकेचा निर्णय
BMC | (File Photo)

मुंबई महापालिकेत (Brihanmumbai Municipal Corporation) वय वर्षे 50 पूर्ण असलेल्या लिपिक व कनिष्ठ लेखा परीक्षा सहाय्यकांना पुढील पदोन्नतीसाठी आता परीक्षा देण्याची गरज नाही. मुंबई महापालिकेने या कर्मचाऱ्यांसाठी ही अटक शिथील केली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना परीक्षेशिवायही थेट प्रमोशन (BMC Employee Promotion) मिळणार आहे. पालिका (BMC) प्रशासन आणि कामगार संघटना यांच्यात मंगळवारी (12 ऑक्टोबर) एक बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे हजारो बीएमसी कर्मचाऱ्यांना (BMC Employee) दिलासा मिळाला आहे.

ख्य लिपिक व वरिष्ठ लेखा परीक्षा सहाय्यक पदासाठी पदोन्नती देताना मुंबई महापालिका परीक्षा घेत असे. ही परीक्षा देताना 50% गुण मिळाल्यास संबंधित उमेदवार (कर्मचारी) पदोन्नतीसाठी पात्र ठरत असे. उर्वरीत 25% पदांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती दिली जात असे. दरम्यान, राज्य सरकारने ऑगस्ट 2001 पासून लागू केलेल्या सेवांतर्गत पदोन्नती योजनेत वयाची 50 वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट शिथिल केली आहे. दरम्यान, अनेकदा आगोदर पदोन्नती आणि मग परीक्षा घेतली जाते, असा दावा करत कामगार संघटनांनी पालिकेतही अशाच नियमाची अंमलबजावणी करावी असा अग्रह धरला होता. त्यास पालिका प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला. (हेही वाचा, Mumbai BMC Recruitment 2021: बीएमसी मध्ये विकास अधिकारी आणि सहाय्यक समाज विकास अधिकारी या पदांसाठी नोकरभरती; 12 ऑक्टोबर पूर्वी असा करा अर्ज)

कामगार, कर्मचारी संघटना समन्वय समितीने पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासोबत संवाद साधला. या वेळी समितीचे निमंत्रक अॅड. प्रकाश देवदास, बाबा कदम, अॅड. सुखदेव काशिद, अॅड. महाबळ शेट्टी वामन कविस्कर, सत्यवान जावकर, बा. शि. साळवी, के. पी. नाईक, संजीवन पवार, अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार, कामगार विभाग प्रमुख अश्विनी जोशी, सहआयुक्त मिलिन सावंत, रमेश पवार, चंद्रशेखर चौरे आदी उपस्थित होते.