मुंबई मध्ये शाळांचे नामफलक आता मराठीत अनिवार्य; BMC ने जारी केलं परिपत्रक
Schools | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रातील दुकानं आणि आस्थापनांवर मराठी फलक लावण्याचे आदेश दिल्यानंतर आता मुंबई पालिकेच्या सर्व शाळांचे नामफलक मराठी (Marathi)  भाषेत लावणं अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच ते नामफलक हे मराठी देवनागरी लिपीमध्ये असावेत असे आदेश आहेत. या नियमावलीनुसार, 8×3 फीट आकाराचे बोर्ड्स शाळेबाहेर लावावे लागणार आहेत.

मुंबई मध्ये अनुदानित, विनाअनुदानित तसेच सार्‍या खाजगी बोर्डच्या शाळेमध्ये मराठी फलक लावण्यात याव्यात ही मागणी युवासेनेने मुंबईच्या शिक्षण विभागाच्या शिक्षणअधिकारी राजेश कंकाळ आणि राजू तडवी यांच्याकडे करण्यात आली होती. हे देखील नक्की वाचा: महाराष्ट्र: राज्यात 2020-21 शैक्षणिक वर्षापासून पहिली ते सहावी वर्गासाठी सर्व माध्यमांच्या शाळांना मराठी भाषा विषय शिकवणे अनिवार्य .

AN Tweet

मुंबईमध्ये अनुदानित 394, विनाअनुदानित 678 आणि अन्य खासगी बोर्डाच्या 219 शाळांसाठी हे नियम लागू असणार आहेत. दरम्यान जे नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना शिक्षण हक्क कायदा २००९ (Right To Education, RTE) अंतर्गत नमुना २ अन्वये मिळणारी प्रथम मान्यता देण्यात येऊ नये, असे या निवेदनाद्वारे सुचविण्यात आले होते.