BMC Committee Heads Elections 2020 : सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असणार्या मुंबई महानगर पालिकेमध्ये (Brihanmumbai Municipal Corporation) आज शिक्षण समिती आणि स्थायी समिती अध्यक्ष पदाची निवड झाली आहे. दरम्यान या दोन्ही समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक शिवसेनेने पुन्हा जिंकत सत्तेच्या तिजोरीच्या चाव्या स्वतःकडे ठेवण्यात यश मिळवले आहे. दरम्यान आज सकाळी 11 च्या सुमारास शिवसेनेच्या संध्या दोशी शिक्षण समितीच्या अध्यक्ष (BMC Education Committee) झाल्या तर आता दुपारी 2 नंतर पार पडलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या (BMC Standing Committee) निवडणूकीमध्ये शिवसेनेचे यशवंत जाधव (Yashwant Jadhav) विजयी ठरले आहेत. स्थायी समिती अध्यक्षपदी आज (5 ऑक्टोबर) त्यांची सलग तिसर्यांदा निवड झाली आहे.
स्थायी समिती आणि शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये कॉंग्रेस पक्षाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेत शिवसेनेला विजयाचा मार्ग मोकळा करून दिला आहे. दरम्यान स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणूकीपूर्वी देखील आसिफ झकेरिया यांनी आपला अर्ज मार्ग घेत यशवंत जाधव यांचा मार्ग मोकळा केला. तसेच शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवडून आल्यास त्याची स्थायी समितीमध्ये पदसिद्ध सदस्य म्हणून निवड होते. त्यामुळे आपोआपच शिवसेनेचं संख्याबळ तगडं झाले होते.
सन २०२०-२०२१ साठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी आज (५ ऑक्टोबर २०२०) झालेल्या निवडणुकीत श्री. @iYashwantJadhav हे विजयी झाले. सलग तिसऱ्यांदा स्थायी समिती अध्यक्ष म्हणून श्री. जाधव ह्यांची निवड झाली आहे. pic.twitter.com/pjMJ8ZbkQL
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 5, 2020
यशवंत जाधव स्थायी समिती अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर पालिका मुख्यालयात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.
स्थायी समितीमध्ये शिवसेना 11, भाजपा 10, कॉंग्रेस 3, एनसीपी आणि समाजवादी पक्ष प्रत्येकी 1 असे संख्याबळ होते. तर शिक्षण समिती अध्यक्षपदामुळे एकूण 12 मतं शिवसेनेकडे होती.