सध्या आर्थिक मंदीचे कारण देत अनेक कंपन्या कर्मचाऱ्याना कामावरुन कमी करत आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केल्याने अनेक तरुणांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या असून सध्या ते नोकरीच्या शोधात आहे. यामुळे हल्ली मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणी नोकरीच्या (Job) शोधात आहेत. तसेच खासगी क्षेत्रात नोकरीसाठी (Private Jobs) मोठी स्पर्धा आहे शिवाय त्या नोकरीची लांब कालवधीची हमी देखील कमी असते. म्हणून सरकारी नोकरी (Government Jobs) मिळालेली सर्वोत्तम. पण सरकारी कार्यालयात (Government Office) नोकरीची संधी शोधत असतात.
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी एक आनंदाची बातमी असून मुंबई महानगर पालिकेत Executive Assistant (कार्यकारी सहाय्यक) पदासाठी 1178 जागांची भर्ती ही होणार आहे. या पदासाठी जर तुम्हाला आवेदन करायचे असल्यास तुम्ही 16 जून ही अंतिम तारिख आहे. या पदासाठी किमान तुम्ही पदवीधर असावे आणि या परिक्षेचे परिक्षा शुल्क हे हजार रुपये असणार आहे. या पदासाठी 21700 ते 69100 पेस्केल असणार आहे.
या पदासाठी आवेदन करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि मान्यताप्राप्त विद्यापिठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधि किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
https://www.majhinaukri.co.in/mcgm-recruitment/ या वेबसाईटवरुन तुम्ही या नोकरीसाठी आवेदन करु शकता.