कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणासाठी मुंबई महापालिका (BMC) आता एक अभिनव अभियान राबविणार आहे. कोरना रुग्ण तपासणीसाठी मुंबई महापालिका सार्वजनिक पार्किंग (Public Parking Lots) ठिकाणीही शोध घेणार आहे. म्हणजेच सार्वजनिक पार्किंग (PPL) असलेल्या ठिकाणी जाऊन मुंबई महापालिकेचे अधिकारी कोरोना व्हायरस चाचणीसाठी नमुने गोळा करणार आहे. जेणेकरुन कोविड 19 (COVID-19) विषाणुची लागण झालेल्या रुग्णांपर्यंत पोहोचणे सोपे जाईल. खास करुन भायखळा, शिवडी, परेल, दादर, मुलुंड, बोरिवली, कांजुरमार्ग आणि विक्रोळी अदी ठिकाणी हा अभियान राबविण्यात येणार आहे.
थायरोकेयर टेक्नोलॉजीज, एसआरएल लिमिटेड, इनफेएक्सएन लॅबोरेटरीज आणि मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड सारख्या प्रयोगशाळांमध्ये हे अभियान हाती घेण्यात येणार आहे. प्रयोगशाळांना दररोज संबंधित वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि वॉर्ड यांना अहवाल सादर करावा लागेल आणि बायोमेडिकल कचरा विल्हेवाट लावण्यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांकडे जावे लागेल. त्यांना संपर्क करावा लागणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने या वृत्तात म्हटले आहे की, प्रत्येक प्रयोगशाळांमध्ये सुमारे 200 संशयित रुग्णांची तपासणी केली जाईल, त्यामुळे सर्व 17 पीपीएलमध्ये अंदाजे 3,000 चाचण्या केल्या जाऊ शकतात. (हेही वाचा, Maharashtra Lockdown Extended: महाराष्ट्रात 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा)
प्रभाग अधिका्यांनी घरी किंवा संस्थात्मक क्वारंटाईन असलेल्या त्यांच्या प्रभागातील रहिवाशांना आणले पाहिजे. त्यांची चाचणी केली पाहिजे. महानगरपालिकेने किट न दिल्यास चाचणीचा शुल्क 3,500 रुपये असेल. बीएमसीने पुरविलेल्या किटसाठी शुल्क 1,500 रुपये असेल, ”असे एका नागरी अधिकाऱ्याने म्हटले आहे.