Holika Dahan In Mumbai: जमावबंदी लागू होत असल्याने मुंबईकर रात्री होलिका दहन साजरी करण्याबाबत संभ्रमात; BMC कडून 5 जणांच्या उपस्थितीला परवानगी
Holika Dahan (Photo Credits: Wikimedia Commons)

वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल देणारा सण म्हणजे होळी (Holi). आज राज्यभर रात्री होलिकादहन (Holikadahan) केले जाईल तर उद्या धुलिवंदनाचा (Dhulivandan) सण साजरा केला जाणार आहे. मात्र या सणाच्या दिवसांवर आता कोरोनाचं संकट आहे. आज रात्रीपासूनच महाराष्ट्रभर नाईट कर्फ्यू (Night Curfew) लागू होणार आहे. त्यामुळे जमावबंदीच्या आदेशात होळी कशी पेटवायची? आणि ती पेटवायची की नाही? असे अनेक प्रश्न मुंबईकरांच्या मनात आहेत. पण मुंबई महानगर पालिकेने (BMC) त्यावर उत्तर देताना मुंबईत होळी पेटवण्यावर निर्बंध नसल्याचं म्हटलं आहे. BMC Guidelines for Holi 2021: यंदा मुंबईत धुलिवंदन नाही! कोरोना व्हायरस संसर्ग टाळण्यासाठी बीएमसीने जारी केले आदेश.

मुंबई मध्ये जमावबंदीच्या नियामांत सार्वजनिक ठिकाणी एकावेळी 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमू नयेत असे आदेश दिले आहेत. त्यामुळे होळी पेटवली तरीही मुंबईकरांनी सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन हा सण साजरा करू नये असे आदेश दिले आहेत. दरम्यान मुंबईकरांना होळी पेटवण्याची संमती असली तरीही होळीची खरी मज्जा असलेला धुलिवंदनासोबत रंगोत्सव साजरा करण्याचा खेळ मात्र सार्वजनिक स्वरूपात खेळता किंवा आयोजित करता येणार नाही. Holika Dahan 2021: आज होलिका दहनाचा दिवस; जाणून घ्या होळी पेटवण्याचा मुहूर्त काय?

दरवर्षी हुताशनी पौर्णिमेच्या रात्री होळी उभारून ती जाळून त्याच्याभोवती बोंबा मारत सारे अनिष्ट दूर व्हावं याकरिता प्रार्थना केली जाते पण सध्या मुंबई, नागपूर, पुणे शहरातील वाढता कोरोना संसर्ग पाहता आता नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी पुन्हा जमावबंदीचे कडक नियम लागू करण्यात आले आहेत.

महापौर किशोरी पेडणेकरांकडून प्रतिकात्मक होळी जाळण्याचे आवाहन

देशात सर्वाधिक कोरोनाबाधित अ‍ॅक्टिव्ह रूग्ण महाराष्ट्रात आहेत. काल मुंबई मध्ये उच्चांकी 6123 रूग्ण 24 तासांत समोर आले आहेत तर राज्यांत 36,902 नवे कोरोनाबाधित रूग्ण समोर आले आहेत. राज्यात एकूण 282451 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.2% झाले आहे.