
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai Pune Expressway) वरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर तब्बल सात दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. धोकादायक दरडी हटवण्याचे काम करण्यात येणार असल्याने हा ब्लॉक घेण्यात येणार असून हे काम तळेगाव टोलनाका ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ला जोडणाऱ्या मार्गावर असणार आहे.
दरडी हटवण्याच्या कामामुळे 14-17 मे आणि 21-23 मे दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत असणार आहे. प्रत्येक तासाला 15 मिनिटे वाहतूक बंद करण्यात येईल. या कालावधीत एकूण 6 ब्लॉक असतील.
ब्लॉकची वेळ
ब्लॉक 1- सकाळी 10-10.15
ब्लॉक 2- सकाळी 11-11.15
ब्लॉक 3- दुपारी 12-12.15
ब्लॉक 4- दुपारी 2-2.15
ब्लॉक 5- दुपारी 3-3.15
ब्लॉक 6- दुपारी 4-4.15
ब्लॉक काळात प्रवास करताना प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. मात्र प्रवाशांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.