पत्नी, धनप्राप्तीसाठी तरुणाला विवस्त्र करुन पूजा; नंदूरबारमध्ये जादूटोणा
पैसे आणि चांगल्या बायकोसाठी अघोरी पूजा (प्रतिकात्मक आणि संग्रहीत प्रतिमा)

लोक कशासाठी काय करतील आणि कोणत्या स्तराला जातील याचा काही नेम नाही. नंदूरबारमध्ये चक्क चांगली पत्नी मिळावी यासाठी तरुणाला विवस्त्र करुन पुजा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रथमदर्शनी हा जादुटोण्यातला प्रकार असावा असा अंदाज आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच, एक आरोपी आणि एका पुजाऱ्यालाही अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पैशाचा हव्यास आणि चांगली बायको या कारणासाठी हा प्रकार करण्यात आला. आरोपींनी ही अघोरी पूजा केली. मात्र, या पूजेमध्ये परिसरातील इतर तरुणांनीही सहभागी व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केले. समाजाच्या डोळ्यात येऊ नये यासाठी हा सर्व प्रकार गुपचूप सुरु होता. परंतू, एका पीडित तरुणाने आरोपींनी आपल्याला विवस्त्र करुन पूजा केल्याचे घरी सांगितले आणि प्रकरणाचा भांडाफोड झाला.

आरोपी हे नरबाळी देण्याच्या विचारात होते, असेही पुढे आले आहे. दरम्यान, नंदूरबार शहर पोलिसांनी जादूटोणा प्रतिंबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.