BKC Girder Collapse Updates: बीकेसी दुर्घटनेप्रकरणी प्रोजेक्ट मॅनेजर आणि कॉन्ट्रक्टरविरोधात गुन्हा दाखल
Under-Construction Flyover Collapses in Bandra Kurla Complex (Photo Credits: ANI)

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (Bandra Kurla Complex) बीकेसी मेन रोड आणि सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (Santacruz-Chembur Link Road) यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. शुक्रवारी (17 सप्टेंबर) पहाटे अचानक त्याचा काही भाग कोसळल्यामुळे 14 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यापैकी बहुतेक जण हे उड्डाणपुलाचे बांधकाम करणारे मजूर असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी प्रोजेक्ट मॅनेजर (Project Manager) आणि कॉन्ट्रक्टरविरोधात (Contractor) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) माहिती दिली आहे.

ही दुर्घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे. या दुर्घटनेत 14 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये 21 ते 49 वयोगटातील लोक आहेत. हे धक्कादायक बाब म्हणजे, या पुलाचे काम सुरु असतानाच ही दुर्घटना घडल्याने प्रोजेक्ट मॅनेजर आणि कॉन्ट्रक्टरविरोधात 336 अन्वये भादंविच्या आयपीसीच्या इतर संबंधित तरतुदींखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. हे देखील वाचा- Bandra Fire: वांद्रे येथील रंग शारदाच्या पाठीमागील झोपड्यांना आग (Video)

बीकेसी अंतर्गत एससीएलआर जोडरस्त्यांवर बीकेसी आणि कुर्ला उड्डाणपूलाला जोडणा-या कामादरम्यान झालेली दुर्घटना सुरक्षा मानक आणि नियमांचे उल्लंघन आहे. यात झालेला अक्षम्य निष्काळजीपणा लक्षात घेता संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे शुक्रवारी केली होती.