Nilesh Rane, Deepak Kesarkar | (Photo Credit: Archived, edited, representative images)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करुन भलेही भाजपसोबत सत्ता स्थापन केली असेल. परंतू, हे सत्तानाट्य भाजपमधील किती लोकांना आवडले? याबाबत अनेकांकडून शंका उपस्थित केली जात आहे. राजकीय वर्तुळात तशा चर्चाही आहेत. या चर्चा असतानाच केंद्रीय मंत्री आणि भाजप (BJP) नेते असलेल्या नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. त्यामुळे कोकणात पुन्हा एकदा राणे विरुद्ध केसरकर असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. निलेश राणे यांनी सोशल मीडियावर असा एक व्हिडिओच शेअर केला आहे.

दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या वतीने तेच भूमिका मांडत असतात. दीपक केसरकर यांनी नुकतीच राणे यांच्या मुलांवर टीका केली होती. नारायण राणे यांची दोन्ही मुले लाहान आहेत. त्यामुळे ते काय बोलतात, ट्विट करतात हे मी पाहात नाही. सध्या मी दिल्लीत आहे. महाराष्ट्रात नाही. परंतू, महाराष्ट्रात गेल्यानंतर ही बाब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालीन. देवेंद्र फडणवीस हे त्यांना समज देण्याचे काम योग्यप्रकारे करतील, अशी भावना केसरकर यांनी व्यक्त केली होती. (हेही वाचा, Deepak Kesarkar On Shiv Sena: शिवसेना फुटीमागे प्रत्येक वेळी शरद पवार; दिपक केसरकर यांचा खळबळजनक आरोप)

ट्विट

निलेश राणे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, दीपक केसरकर आपण 25 दिवसांपूर्वी कितील लाहान होतात हे स्वत:लाच विचारा. तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते असाल. आमचे नाही. त्यामुळे तोंड सांभाळून बोला. काही कारणांनी तुम्हाला इज्जत मिळते आहे. ती घ्यायला शिका. उगाचच वाट्टेल ते बोलू नका. तुमच्या संपूर्ण मतदारसंघाला माहिती आहे. नारायण राणे यांची मुले काय आहेत. अनेक नगरपरिषदा, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती आम्ही तुमच्याकढून हिसकावल्या आहेत. तुम्हाला थोडक्यात राजकीय जीवदान मिळाले आहे. नाहीतर तुमचा खेळ संपला होता. त्यामुळे आवरा स्वत:ला उगाचच काहीही बोलू नका. आगोदर ठरवून घ्या कोणाबद्दल बोलायचे आहे. काय बोलायचे आहे. अन्यथा तुम्हाला तुम्ही सांगाल त्या भाषेत उत्तर देण्याची आमची तयारी आहे. आम्ही गप्प बसणार नाही, असा ईशाराही निलेश राणे यांनी केसरकर यांना दिला आहे.