BJP Vs Eknath Shinde Group: उद्धव ठाकरे यांना मानता तर त्यांना सोडून आलातच का? निलेश राणे यांचे दीपक केसरकर यांच्यावर टीकास्त्र
Deepak Kesarkar, Nilesh Rane | (Photo Credit: Archived, edited, representative images)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी करुन भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या सत्तास्थापनेनंतर शिंदे गट (Eknath Shinde Group) आण भाजपमधील काही लोक यांच्यात संघर्ष घडताना पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने हा संघर्ष शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे चिरंजीव निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यात पाहायला मिळत आहे. या संघर्षाला कोकणातील सत्ताकारण आणि राजकारणाची किनार आहे. त्यामळे दीपक केसरकर आणि राणे समर्थक यांच्याकडून एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सुरु आहे. निलेश राणे यांनी आज तर दीपक केसरकर यांना थेटच सवाल विचारला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आपले इतकेच प्रेम आहे तर त्यांना सोडूनच का आलात? राणे यांच्या सवालावर केसरकर काय उत्तर देतात याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, BJP Vs Eknath Shinde Group: एकनाथ शिंदे गट विरुद्ध भाजप; निलेश राणे यांची दीपक केसरकर यांच्यावर सडकून टीका)

दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. ते या गटाचे प्रवक्ते आहेत. असे असले तरी त्यांनी आपल्या बोलण्यातून मातोश्री प्रेम जपले आहे. त्यामुळे शिंदे गटाची भूमिका मांडताना ते अनेकदा ''उद्धव ठाकरे हे आजही आमचे आदरणीय असून आम्हाला आजही त्यांनी बोलवावे, आम्ही जायला तयार आहोत. उद्धव ठाकरे यांच्याविषयी कुणी काहीही बोलले तर ते आम्हाला चालणार नाही़ भाजपच्या नेत्यांना आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनाही आम्ही सांगितले आहे की, उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणी काहीही बोलले तर ते खपवून घेतले जणार नाही'', अशी भूमिका ते वारंवार व्यक्त करतात. याच मुद्द्यावरुन केसरकर यांनी नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांवर जोरदार टीप्पणी केली होती. त्याला आता निलेश राणे यांनी आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, निलेश राणे यांनी टीव्ही 9 सोबत बोलताना म्हटले आहे की, दीपक केसरकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे राजकीय जीवदान मिळाले आहे. आज आपण एका युतीमध्ये आहोत. त्यामुळे तुम्हाला जेवढी आमची गरज आहे तेवढीच गरच आमचीही तुम्हाला आहे. त्यामुळे बोलताना विचार करुन बोला. तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते आहात. भाजपचे नाही. त्यामुळे त्यामुळे तुम्ही (केसरकर) आम्हाला सांगण्याच्या भानगडीत पडू नये. आज त्यांच्या मतदारसंघात असलेल्या एकूण नगरपालिका, नगरपंचायच, जिल्हा परिषद, पवंचायत समिती, ग्रामपचायत यापैकी त्यांच्याकडे काहीच नाही. सर्व ठिकाणी भाजप आहे. त्यामुळे त्यांना एकनाथ शिंदे यांच्यामुळे ज्या राजकीय कुबड्या मिळाल्या आहेत त्याचा त्यांनी विचार करावा. त्यांना भाजपच्या लोकांबद्दल बोलण्याचा अधिकार अजिबात नाही. ते आताच नव्याने बोलायला शिकले आहेत. त्यामुळे त्यांनी आगोदर नीट बोलायलाल शिकून घ्यावे. ते सांगतात नारायण राणे यांनी बोलण्याची शैली बदलून घ्यावी. आज केसरकर यांच्या पाठीमागे त्यांच्या मतदारसंघात 25 लोकही नाहीत आणि ते राणेंना शैली बदलायला सांगतात, असा टोलाही निलेश यांनी केसरकरांना लगावला.

पुढे बोलताना निलेश राणे यांनी म्हटले आहे की, दीपक केसरकर हे अल्पवधीतच स्वत:ला विश्वप्रवक्ते समजू लागले आहेत. ते म्हणतात उद्धव ठाकरे यांच्यावर बोलायचे नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आपले इतकेच प्रेम आहे तर त्यांना सोडूनच का आलात? असा सवालच राणे यांनी केसरकरांना या वेळी विचारला.