Shivsena-BJP पक्षाने निवडणुक एकत्रित लढावी ही जनतेची इच्छा- रावसाहेब दानवे
रावसाहेब दानवे (फोटो सौजन्य- ट्विटर)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पंढपुरात (Pandharpur) महासभेचे आयोजन केले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जागावाटप गेले खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचं बघा असे म्हटले. त्याचबरोबर युतीचा निर्णय जनताच घेईल असे म्हटले आहे.  सभेच्या दरम्यान  दुष्काळ, राम मंदिर, कांदा प्रश्न, राफेल घोटाळा अशा विविध विषयांवर भाष्य करत भाजपावर टीका केली. तरीही भाजपकडून शिवसेना युती करणार असे गृहीत धरले आहे.

येत्या 2019 च्या लोकसभा निवडणूकीसाठी सेना-भाजप (Shivsena-BJP) पक्षाने एकत्र लढावे अशी जनतेची इच्छा असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी नागपुरात म्हटले आहे. तसेच राफेल बद्दल उद्धव ठाकरे यांनी केलेल्या व्यक्तव्यावर राफेलचा विषय उरला नसल्याचा टोला लगावला आहे.(हेही वाचा - उद्धव ठाकरे पंढरपूर दौरा: राफेल मुद्द्यावर सरकार उत्तर का देत नाही: उद्धव ठाकरे यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल)

तसेच राज्यातील 90 टक्के शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले असल्याचे दानवे यांनी वक्तव्य केले आहे. तर उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका करत राज्याचा पाहरेकरी हाच चोर असल्याचे ही वादग्रस्त भाष्य केले आहे.