उद्धव ठाकरे पंढरपूर दौरा: राफेल मुद्द्यावर सरकार उत्तर का देत नाही: उद्धव ठाकरे यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे | (Photo courtesy: Facebook)

Uddhav Thackeray   Pandharpur Visit: राफेलच्या मुद्द्यावर सरकार गप्प का बसतं आहे. लष्करासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या साहित्यात जर घोटाळेबाजीचा आरोप करण्यात येत असेल तरे गंभीर आहे असे सांगतानाच  पंतप्रधान मोदींनी राफेल आणि शस्त्रखरेदी घोटाळ्यावर बोलावं, असं जाहीर अवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर येथील जाहीर सभेतून केले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी राफेलच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला जोरदार लक्ष केले. ते म्हणाले, जर काही काळापूर्वी जन्माला आलेल्या आणि शस्त्रास्त्रनिर्मितीचा कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीला राफेलसारखे कंत्राट मिळत असेल तर, आमच्या भगिनिंच्या बचतगटांनाही बंदुकीच्या गोळ्या बनवाचं कंत्राट द्या. त्या पोळ्या बनवतात तर गोळ्याही बनवतील असा उपहासात्मक टोलाही उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला लगावला.

शिवसेना धनगर समाजाच्य पाठीशी - उद्धव ठाकरे

आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेना ज्या प्रमाणे मराठा समाजाच्या पाठीशी उभी राहीली त्याच प्रमाणे शिवसेना धनगर आणि इतर सर्व समाजाच्या पाठीशी राहील, असे अश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर येथे दिले. या वेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोराम आणि छत्तीसगड येथे भाजपच्या झालेल्या पराभवावरुन आपल्या खास शैलीत उद्धव यांनी भाजपला टोले लगावले. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आमचाच पक्ष जिंकणार असे जे लोक छतीठोकपणे सांगत होते. त्यांच्या छातीठोकपणाच्या ठिकऱ्या झाल्या आता ते पक्ष तिकडे तोंड दाखवायला जाणार नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ते आठ हजार कोठी गेले कुठे?

शेतकऱ्यांच्या डोळ्यात असू असताना आमच्या चेहऱ्यावर हसू येणार नाही. हिंमत असेल तर, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. केंद्राचे पथक आले आणि परत केले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आठ कोठीचे पॅकेज दिल्याचे सांगितले गेले. पण, मग ते आठ हजार कोठी गेले कुठे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

अयोध्या मंदिर दिखेगा कब?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सांगतात की अयोध्यात राम मंदिर था, हैं और रहेगा. पण, था, हैं. रहेगा लेकीन दिखेगा कब? असा सवाल विचारत उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आणि भाजप नेतृत्वावर टीकास्त्र सोडले.

सभेला तुफान गर्दी

पंढरपूर येथे उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेला प्रचंड गर्दी जमली होती. ज्या मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होती त्या मैदानावर यापूर्वी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची सभा झाली होती. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सभा ठिकाणी झाली होती. वाजपेयी आणि मोदी यांच्याही सभेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष होण्यापूर्वी येथे सभा घेतली होती. मात्र, गाधी यांच्या सभेला येथे म्हणावी तशी गर्दी पाहायला मिळाली नव्हती. दरम्यान,उद्धव ठाकरे यांच्या आज झालेल्या सभेला मात्र, मोदी आणि वाजपेयी यांच्या सभेप्रमाणेच प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.  (हेही वाचा, महाराष्ट्रात क्रांतीची ठिणगी टाकण्यासाठी उद्धव ठाकरे विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला;राम मंदिर मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता!)

क्रांतीची ठिणगी टाकण्यासाठी पंढरपूरमध्ये- उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (सोमवार, २४ डिसेंबर) पंढरपूर दौऱ्यावर आहेत. पंढरपूर दौऱ्यात त्यांनी मंदिरात जाऊन विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेणार घेतलं आणि त्यानंत सभास्थळी हजेरी लावली. या निमित्ताने शिवसेनेकडून पंढरपूरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जात असल्याचे पाहायला मिळत आहे. आजच्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, 'विठोबा हा आमचा आत्मा आहे. हाच तो आमचा देव, ज्याने महाराष्ट्र एकसंध ठेवला' असे सांगत 'गरीब, कष्टकरी, शेतकरी, मजुरांचा हाच देव आहे आणि त्याच्याच चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्रात क्रांतीची ठिणगी आम्ही टाकू इच्छितो. याच ठिणगीने आज कोरडी झालेली चंद्रभागा खळखळता प्रवाह घेऊन महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् केल्याशिवाय राहणार नाही, अशा इशाराही ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र समजल्या जाणाऱ्या दै. सामनातून आगोदरच दिला होता.