Uddhav Thackeray | (Facebook)

मुंबईतील शिवडी येथील शिवसेना शाखेचं उद्घघाटन करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. अरविंद सावंत, सुभाष देसाई, सचिन अहिर, किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Govt) वर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनी भाजप (BJP) टीका करत म्हणाले की भाजप ही शिवसेनेला (Shivsena) संपवायला निघाली आहे. भाजपला ठाकरे आणि शिवसेना हे नातं संपवाचं आहे. याआधी अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. भाजपला मुंबईवरुन भगवा हाटवून त्याना त्यांचा झेंडा लावायचा आहे पण अस कधी होणार नाही. ज्यांना शेंदूर लावला, ते शिवसेना गिळायला निघाले आहेत. त्यांना भाजपची साथ आहे, भाजपला अंदाज नाही, कोणत्या शक्तीसोबत पंगा घेतलाय, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

त्यांनी कपाळावर टिक्का लावून घेतलया गद्दाराचा

किती वादळ आली तरी शिवसेनेची पाळं मुळं घट्ट आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले आहे.  जे गेले त्यांचं कोणत्या भाषेत वर्णन करायचं. बंडखोर काल म्हणाले आम्हाला गद्दार बोलू नका अशी विनंती त्यांनी केली. हे आम्ही नाही, त्यांनी त्यांच्या कपाळावर टिक्का लावून घेतलया गद्दाराचा. जे गेले आहेत, त्यांच्या बरोबर एकही शिवसैनिक गेला नाही, तसेच गद्दारांना कुठल्या ना कुठल्या पक्षात जाण्याशिवाय पर्याय नाही, असे अनेक तज्ज्ञ सांगतात. काल त्यांना एका पक्षाने ऑफर दिली आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर लगावला आहे. (हे देखील वाचा: Sanjay Raut: उद्धव ठाकरेंशिवाय शिवसेनेची कल्पनाच नाही राऊतांच वक्तव्य, शिंदे सरकारबाबतचा ठरवला 'हा' अंदाज)

हेच तेव्हा केलं असतं तर सन्मानाने झालं असतं

2019 विधानसभा निवडणुकीच्या वेळी सत्तेचं वाटप 50 टक्के ठरलं होतं. जे ठरलं होतं ते आज त्यांनी केल. हेच तेव्हा केलं असतं तर सन्मानाने झालं असतं. जे आज मनावर दगड ठेवून करावं लागतं, ते करायची गरज आज पडली नसती. असा टोमणाही उद्धव ठाकरें यांनी केली आहे. अरविंद सावंत बऱ्याच दिवसापासून कार्यलायचं उद्घघाटन करण्यासाठी बोलवत होते. पण मी दुर्लक्ष करत होतो. पण आता दुर्लक्ष करुन चालणार नाही. आमदार-खासदार म्हणतात ते आता ऐकावं लागणार, कारण दिवसच असे आले आहे, असा खोचक टोमणा उद्धव ठाकरे शिंदे गटावर केला आहे.