भारतीय जनता पक्षाच्या रावेल (Raver) येथील खासदार रक्षा खडसे ( Raksha Khadse) यांच्या नावाचा उल्लेख त्यांच्याच पक्षाच्या (भाजप) अधिकृत संकेतस्थळावरुन (BJP Official Website) आक्षेपार्ह पद्धतीने करण्यात आला आहे. या गंभीर प्रकाराचा एक स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घडल्या प्रकाराची जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, या प्रकाराची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनीही दखल घेतली असून, संबंधितांवर भाजपने कारवाई करावी अन्यधा राज्याचा सायबर सेल विभाग आवश्यक ती कारावाई करेल असा इशाहाही देशमुख यांनी दिला आहे.
काय आहे प्रकरण?
खासदार रक्षा खडसे यांची भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर ओळख दिली आहे. ही ओळख देताना रक्षा खडसे यांचे छायाचित्र आणि त्याखाली त्यांच्या नावासोबत 'होमोसेक्शुअल' (Homosexual) असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकाराचा स्क्रनिशॉट व्हायरल झाल्यानंतर भाजपने संकेतस्थळावर घडलेली चूक सुधारत नवे अपडेट केले आहे. आता रक्षा खडसे यांच्या नावाखाली त्यांच्या मतदारसंघाचे नाव दिसत आहे. (हेही वाचा, Jalgaon: भाजप खासदार रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात व्यासपीठावरच खडाजंगी)
अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया
खासदार रक्षा खडसे यांच्याबाबत घडलेल्या प्रकारनांतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “भाजपाच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे जी यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपा आपण दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल.”
Shocking to see such a derogatory description of Raksha Khadse, BJP MP from Maharastra on the official site of the BJP. Maha Govt. will not tolerate this disrespectful behaviour towards women. @BJP4India must take action against those responsible or @MahaCyber1 will step in. https://t.co/wKVilGB79I
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 27, 2021
दरम्यान, खासदार रक्षा खडसे यांच्याबाबत घडलेला प्रकार हा गुगल ट्रान्सलेशनमुळे घडलेली तांत्रिक चुक असावी असे बोलले जात आहे. गुगल ट्रान्सलेशनने (Raver) रावेर या शब्दाचे भाषांतर 'होमोसेक्शुअल' असे केले असावे अशी चर्चा आहे. भाजपकडून मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.