महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2019) रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. कधी कधी याच अतिउत्साहात सभांमध्ये नेतेमंडळींची जीभ घसरते आणि आक्षेपार्ह्य विधाने समोर येत असतात. असाच काहीसा प्रकार भाजपचे मुंबई अध्यक्ष (BJP Mumbai Chief) मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्याबाबत बुधवारी घडला. मुंबादेवी येथे कुंभारवाडा (Kumbharwada) परिसरात लोढा यांनी सभा घेताना 1992 साली झालेल्या बॉम्बस्फोटचे उदाहरण देत या परिसरातील मतदार वर्गावर निशाणा साधला होता, तसेच यंदाचे विरोधी उमेदवार अमीन पटेल (Ameen Patel) यांच्यावरही लोढा यांनी टीकास्त्र सोडले होते.याप्रकरणी आता राज्य निवडणूक आयोगाने लोढा यांना नोटीस बजावली असून आपल्या विधानावर स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.
लोढा यांनी भिंडी बाजार आणि नागपाडा येथील मुस्लिम बहुसंख्यांक परिसरात भाषण देत असताना शिवसेनेचे अधिकृत उमेदवार पांडुरंग सकपाळ यांचे समर्थन केले. तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित होते, मात्र उत्साहात लोढा यांनी 1992 च्या दंगलीचा विषय काढला. " या दंगलीमध्ये मुंबईतच किती ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट झाले होते, हे सर्व औद्योगिक क्षेत्र या परिसरातील 5 किमी अंतरात पसरले आहे, हे सर्व करणाऱ्या त्यावेळेच्या इथल्याच लोकांनी निवडून दिलेला उमेदवार येत्या काळात आपल्यासाठी काय काम करणार" असे म्हणत लोढा यांनी मतदारांना संबोधित केले होते.
ANI ट्विट
Election Commission issues notice to BJP Mumbai Chief Mangal Prabhat Lodha for delivering a 'provocative speech' during an election rally in Mumbai on October 16. EC has asked Lodha to reply and clarify on his statement (file pic) #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/Pe4IDHwVwo
— ANI (@ANI) October 18, 2019
अमीन पटेल यांच्यावर देखील लोढा यांनी निशाणा साधताना लोढा यांनी, " जेव्हा भाजपा आणि शिवसेनेचे नेते शपथ घेत असतील तेव्हा तुमच्या मतदारसंघातून असा उमेदवार जो तुम्हाला मनाने, जातीने आवडत नाही त्याने समोर येणे हे चांगले वाटेल का?" असा सवाल केला. दरम्यान, लोढा यांचे भाषण संपल्यावर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सुद्धा याचठिकाणी भाषण केले.