BJP MP Ramdas Tadas: भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुनेचा कुटुंबीयांवर गंभीर आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याकडून व्हिडिओ शेअर
Rupali Chakankar | (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakanka ) यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला कटुंबीयांकडून तिच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत डोळ्यात आश्रू आणून सांगताना दिसत आहे. रुपाली चाकणकर यांनी या व्हिडिओसोबत केलेल्या ट्विटमधील माहितीनुसार ही महिला वर्धा येथील भाजप खासदार रामदास तडस (BJP MP Ramdas Tadas) यांच्या सुनबाई आहेत. चाकणकर यांनी आपले ट्विट नागपूर पोलीस आणि राज्याच्या गृहमंत्रालयालाही टॅग केले आहे. त्यामुळे आगामी काळात कौटुंबीक असलेला हा मामला घरगुती हिंसाचार आणि महिलांचे हक्क, स्वातंत्र्य असे रुप घेणार का? अशी चर्चा आहे.

रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'वर्धा भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुन यांना गेली अनेक दिवस हे तडस कुटूंब मारहाण करून अत्याचार करीत आहेत. पुजाचा आताच हा व्हिडीओ माझ्यापर्यंत आला, तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझे पदाधिकारी व पोलिस सरंक्षणासाठी पोहचले आहेत.' (हेही वाचा, Rupali chakankar Criticizes Chandrakant Patil: 'तुमच्या वया इतकी शरद पवारांची संसदीय कारकिर्द आहे' रुपाली चाकणकर चंद्रकांत पाटील यांच्यावर संतापल्या)

दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केलेला हा व्हिडिओ एकूण 12 सेकंदाचा आहे. या व्हिडिओतील महिलेने तोंडाला मास्क लावला आहे. त्यामुळे या महिलेचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. परंतू, रुपाली चाकणकर यांनी ट्विटमध्ये केलेल्या दाव्यानुसार हा व्हिडिओ भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा यांचा आहे. या व्हिडिओमध्ये महिलेचा अगदी मोजका संवाद आहे. या संवादात ही महिला मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांना मदत मागतेय, माझ्या जीवाला धोका आहे इथे, मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला. मी रिक्वेस्ट करते” असे बोलताना दिसते.  (हेही वाचा, Virginity Test: MBA पदवीधर पतीकडून उच्चशिक्षीत पत्नीची कौमार्य चाचणी; धक्कादायक कृत्यामुळे खळबळ)

खासदार रामदास तडस यांनी ट्विव्ही 9 कडे या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यात तडस यांनी म्हटले आहे की, तडस यांचा मुलगा पंकज आणि पूजा यांचा विवाह झाला आहे. विवाहानंतर हे दोघेही वर्धा येथे राहात होते. दरम्यान, दोघांचे भांडण झाले. माझ्या वडिलांना न विचारता आपण विवाह केला आहे. तेव्हा आपले ठरले होते की, आपण वर्ध्याला राहायचं. मग आता त्यांना त्रास देण्यासाठी त्यांचयाकडे का गेलीस? असे पंकजे तिला विचाले. हे भांडण सुरु असताना मी वर्ध्यातच होतो. मला घरुन फोन आला. मी या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी भाडण सोडवलं. मी घरी पोहोचेपर्यंत पंकज वर्ध्याला गेला होता. त्यानंतर पूजा जवळपास 2 महिने माझ्याकडे राहीली. शेवटी मी तिला म्हणालो. तू पंकजकडे राहायल हवं. अशी रुसुन किती दिवस राहणार.