Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai-Pune Expressway) हा अपघात झाला आहे. दरम्यान, त्यांच्या वाहनाचे अधिक नुकसान झाल्याचे कळत आहे. सुदैवाने, या अपघात कोणालाही गंभीर इजा झाली नसून सर्वजण सुखरूप आहेत. या अपघाताची माहिती होताच त्यांच्या समर्थकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, प्रसाद लाड यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती अतिशय दु:खद आहे. मी आशा करतो की, सुखरूप असतील, अशा आशयाचे ट्विट काँग्रेस नेते सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी केले आहे.

या अपघातानंतर प्रसाद लाड यांनी फेसबूकच्या माध्यमातून आपल्या सर्मथकांशी संपर्क साधला आहे. अपघात झाला ही बातमी जरी खरी असली तरी, श्री सिद्धिविनायकाच्या कृपेने मी सुखरूप आहे. आपण सर्वजण काळजी करू नका. सर्वांचा मनापासून आभारी आहे, अशी फेसबूक पोस्ट त्यांनी केली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील प्रवासी नियमांमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. एक्सप्रेसवेवर आता गती मर्यादा लागू करण्यात आली आहे. जर कोणत्याही व्यक्तीने वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर, 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे, अशीही माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास 50 लाख रुपयांची मदत; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

प्रसाद लाड यांची फेसबूक पोस्ट-

कोरोनाच्या संकट काळात संपूर्ण राज्यात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला होता. ज्यामुळे मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवरील अपघाताच्या घटनेत घट झाली होती. मात्र, राज्यात गेल्याकाही दिवसांपासून लॉकडाऊनच्या निर्बंधाना शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी वाहतूकदेखील सुरु झाली आहे.