Prasad Lad on Sena Bhavan: 'सेना भवन फोडणार' वक्तव्यावरुन भाजप आमदार प्रसाद लाड यांचा युटर्न
Prasad Lad | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई येथील माहिम येथे भाजप (BJP) कार्यालयाचे उद्घाटन करताना भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी चिथावणीखोर वक्तव्य ( Prasad Lad Controversial Statement) केले. या वक्तव्यात त्यांनी 'वेळ आल्यास शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) फोडू' असे म्हटले. दरम्यान, शिवसेना पक्षातून तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या विधानावरुन यु-टर्न घेतला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी बांधलेल्या वास्तूबाबत आपल्याला आदर आहे. आपल्या विधानाचा विपर्यास केला. आपल्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या अतलील तर आपण दिलगीर आहोत, असे लाढ यांनी म्हटले आहे. विधान सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर लाड यांनी त्याचे खापर प्रसारमाध्यमांवर फोडले.

प्रसाद लाड यांनी शनिवारी (31 जुलै) रात्री उशीरा फेसबुकवरुन खुलासा केला. या खुलाशात ते म्हणतात 'शिवसेना प्रमुखांचा आम्ही नेहमीच आदर करतो आणि त्याच शिवसेनाप्रमुखांच्या सेना भवनाबद्दल आम्ही कधी वाईट बोलण शक्य नाही! प्रसारमाध्यमांतून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला..!' फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडिओत प्रसाद लाड म्हणतात की, 'शिवसेना भवन फोडणार अशा माझ्या विधानाच्या विपर्यास केल्याच्या बातम्या दिसत आहेत. पण, मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आणि त्यांनी बांधलेल्या वास्तूबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत असे वक्तव् माझ्याकडून केले जाणार नाही. घाबरण्याचा कोणताही विषय नाही. जर कोणी कारे करत असेल तर त्या कारेला आरे करुनच उत्तर दिले जाईल', असेही प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Sanjay Raut Criticizes Narayan Rane: नारायण राणे यांना अजूनही 'या' नावाने ओळखतात; संजय राऊत यांचा टोला)

प्रसाद लाड यांनी पुढे म्हटलं आहे की, 'जेव्हा आम्ही माहिममध्ये येतो तेव्हा इतका बंदोबस्त ठेवतात की आम्ही शिवसेना भवनच फोडायला निघालो आहोत. माझ्या याच विधानाचा विपर्यास करुन बातम्या दाखवल्या गेल्या. शिवसेना प्रमुखांचा आम्ही नेहमीच आदर करतो आणि त्याच शिवसेनाप्रमुखांच्या सेना भवनाबद्दल आम्ही कधी वाईट बोलण शक्य नाही! प्रसारमाध्यमांतून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला..'

प्रसाद लाड यांनी काय म्हटले? जसेच्या तसे

“भाजपाची ताकद काय आहे हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आपण दाखवून दिलं होतं. कारण, त्यावेळी जी भाजपा होती, भाजपाला मानणारा कार्यकर्ता विचाराचा जो मतदार होता. तो मतदार आज देखील भाजपा बरोबर आहे आणि आता तर सोने पे सुहागा हुआ है…कारण नारायण राणे व राणे कुटुंबीयांना मानणारा देखील खूप मोठास्वाभिमानीचा गट भाजपामध्ये आला आहे. त्यामुळे भाजपाची ताकद ही निश्चितच दुप्पट झाली आहे. नितेशची पुढच्या वेळी आपण थोडे कार्यकर्ते कमीच आणू, कारण आपण आलो की पोलिसच खूप येतात. फक्त त्यांना सांगायचं की वर्दी घालून पाठवू नका म्हणजे आपल्या हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. कारण एवढी भीती तुमची आमची की त्यांना असं वाटतं की हे माहीममध्ये आले म्हणजे सेना भवन फोडणारच, काही घाबरू नका वेळ आली तर ते देखील करू.”