मुंबई: नाईट लाईफ नसून किलिंग नाईट - आशिष शेलार यांची टीका
Ashish Shelar (Photo Credits: ANI)

भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज (22 जानेवारी) मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील नाईट लाईफ (Mumbai Night Life)  सोबतच मनसेच्या महाअधिवेशनाला शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच मागील काही दिवसांपासून नरेंद्र मोदींचा शिवरायांच्या चेहरा मॉर्फ करून व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवरही आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. दरम्यान आज दिल्लीमध्ये संबित पात्रा यांनी सीएए विरोधातील अशोक चव्हाण यांच्या वादग्रस्त वक्ताव्यावरून भाजपा- कॉंग्रेसचा खरपूस समाचार घेतला आहे. मुंबई 24x7 ला राज्य मंत्रिमंडळाची मंंजुरी; 27 जानेवारीपासून शहरात 'नाईट लाईफ' सुरू

महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी 26 जानेवारीपासून मुंबई शहरात नाईटलाईफ़ सुरू करण्याबाबत आदेश दिले आहेत. मात्र आता कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून गृहमंत्र्यांनी पुरेशी तयारी नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये त्यावरा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान नाईट लाईफवर टीका करताना आशिष शेलार यांनी हा प्रकल्प नाईट किलिंग असेल, याआडून भ्रष्टाचाराची सुरूवात होऊ शकते असं म्हटलं आहे.  मुंबई मध्ये 'नाईट लाईफ' मुळे महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होईल: भाजपा नेते राज पुरोहित

23 जानेवारी दिवशी मनसेचं महाअधिवेशन आहे. यामध्ये 14 वर्षांनंतर मनसेचा झेंडा बदलणार आहे. त्यामध्ये भगवा रंग असेल अशी चर्चा रंगल्याने आता मनसेदेखील हिंदुत्त्वाचा मुद्दा उचलणार का? अशी याबाबत सार्‍यांच्याच मनात कुतुहूल आहे. यावर बोलताना जो भगव्याचा सन्मान राखेल तो आपला असेल तर मत व्यक्त करत मनसेच्या नव्या भूमिकेचं भाजपाकडून कौतुक करण्यात आलं आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपासून मनसे आणि भाजपामधील नेत्यांच्या भेटीगाठीमुळे हे दोन्ही पक्ष आता महाविकास आघाडीच्या विरोधात एकत्र येतात का? या चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या होत्या.