Harshavardhan Patil, Ganesh Naik | (Photo Credit: Archived, Edited, Representative Images)

भाजप मेगा भरती 2019:  हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी काँग्रेस (Congress) तर, गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात बुधवारी (11 सप्टेंबर 2019) प्रवेश केला. मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यास अनेक भाजप नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई येथील गरवारे क्लब येथे हर्षवर्धन पाटील यांचा तर, नवी मुंबईतील वाशी येथे भाजप मेगा भरती (BJP Mega Recruitment 2019) कार्यक्रम पार पडला. या वेळी पक्षप्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या आणि मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, काँग्रेस नेते आनंदराव पाटील (Anandrao Patil) आणि कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील इतरही काही नेत्यांचा भाजप प्रवेश पार पडणार असल्याची चर्चा होती. मात्र, काल (11 सप्टेंबर 2019) केवळ हर्षवर्धन पाटील आणि गणेश नाईक यांचाच भाजप प्रवेश पारपडला.

इंदापूरमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला फटका

हर्षवर्धन जाधव यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेस पक्ष आणि आघाडीच्या राजकारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही फटका बसणार आहे. हर्षवर्धन जाधव यांच्या भाजप प्रवेशास राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असलेल्या संघर्षाची किनार आहे. हर्षवर्धन जाधव हे यापूर्वी 4 वेळा विधान सभेवर निवडूण गेले आहेत. मात्र, विधानसभा निवडणूक 2014 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी स्वतंत्र लढले होते. त्यामुळे या जागेवर दोन्ही पक्षांनी उमेदवार रिंगणात उतरवले होते. आता विधानसभा निवडणूक 2019 साठी दोन्ही पक्षांनी आघाडी केली आहे. त्यामुळे आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूरच्या जागेवर दावा सांगत आहे. तसेच, ही जागा काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने नकार दिला आहे. इंदापूरच्या जागेवरुन पुन्हा एकदा काँग्रेस नेता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लोकसभा निवडणुकीत रंगलेला अहमदनगर पॅटर्न (विखे पाटील) पाहायला मिळत आहे. हर्षवर्धन पाटील यांना सहकार क्षेत्र आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे.

नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद खच्ची

राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाची नवी मुंबई शहरात मोठी ताकद आहे. मात्र, राष्ट्रवादीला ताकदीची रसद पुरवणारे नेते गणेश नाईक यांनीच पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवी मुंबईत खिंडार पडले आहे. गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश नवी मुंबई वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये संध्याकाळी ५ वाजता पार पडला.. दरम्यान, गणेश नाईक यांच्यासोबत नवी मुंबई महापालिकेतील तब्बल 48 नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, गणेश नाईक यांचे पूत्र संदीप नाईक यांनी या आधीच आमदारकीचा राजीनामा देत भाजप प्रवेश केला आहे. (हेही वाचा, BJP Mega Recruitment 2019: 'निष्ठेने वागायचं तर, भाजपखेरीज पर्याय नाही', भाजप प्रवेशानंतर हर्षवर्धन पाटील याचे वक्तव्य)

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील अनेक नते भारतीय जनता पक्षात दाखल होऊ लागले आहे. यात वाडवडिलांपासून आपल्या राजकारणातील अनेक वर्षे काँग्रेस विचारांत घालवलेल्या राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. दरम्यान, इतर पक्षांतून भाजपमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या वाढल्याने भाजपधील निष्ठावंतासमोर आपल्याला डावलले तर जाणार नाही ना? अशी शंकेची पाल चुकचुकू लागली आहे. अर्थात निष्ठावंतांना डावलले जाणार नाही, असा दिलासा देण्यास भाजप नेतृत्व विसरत नाही, हेही खरे.