Pankaja Munde Tested COVID Positive: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण; ट्विटरवर दिली माहिती
Pankaja Munde (Photo Credits: Facebook)

Pankaja Munde Tested COVID Positive: भाजप नेत्या पंकजा मुंडे (kaja Munde) यांना कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली आहे. पंकजा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना स्वत: ची कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय खबरदारी म्हणून पंकजा मुंडे यांनी स्वत: ला क्वारंटाईन केलं आहे. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांच्याच कोरोनासदृश लक्षणं दिसली होती.

पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी  सावधगिरी बाळगून स्वत:ला विलग केलं आहे. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचे संक्रमण झाले असेल. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या.' (वाचा - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लसीकरणासंदर्भात महत्वाची बैठक पार पडणार)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांचे खाजगी अंगरक्षक गोविंद मुंडे यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. गोविंद मुंडे यांच्या मृत्यूनंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. 'माझ्या परिवारातील एका तरूण, मेहनती व धाडसी सदस्य आपण गमावला आहे, त्यांच्या कुटूंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो' अशा शब्दांत त्यांनी गोविंद मुंडे यांच्याप्रती शोक व्यक्त केला होता.

याशिवाय पंकजा मुंडे यांचे भाऊ म्हणजेचं सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मागील महिन्यात दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यापूर्वी जून 2020 मध्ये धनंजय मुंडे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. धनंजय मुंडे यांना कोरोना झाल्याचे समजताचं पंकजा मुंडे यांनी त्यांना फोन करुन त्यांची विचारपूस केली होती.