Nilesh Rane & Ajit Pawar (Photo Credits: Facebook, Twitter)

महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aaghadi Government) काही बदल होणार असून उपमुख्यमंत्री पद काँग्रेस (Congress) पक्षाकडे जाणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. यावरुन भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार यांची पुन्हा नॉटरिचेबल होण्याची वेळ आल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसंच उपमुख्यमंत्री पद हा काँग्रेसचा अधिकार असून तो त्यांना मिळालाच पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत पण कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण आता २ उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे म्हणजे अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे."

निलेश राणे ट्विट:

उपमुख्यमंत्री पदाची धुरा काँग्रेसकडे जाणार असून त्यासाठी बाळासाहेब थोरात यांचे नाव आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले की, या चर्चांमध्ये काही तथ्य नसून सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी पक्षस्थापनेवेळी घेतलेल्या निर्णयानुसार काम सुरु आहे. काँग्रेस पक्षातील अंतर्गत बदलात कोणालाही पडण्याची गरज नाही.