करोना संकटामुळे शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा बंदिस्त सभागृहात घेण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख अशा दुहेरी भूमिकेतून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी तडाखेबंद भाषण करत विरोधकांचा समाचार घेतला आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचा बेडूक म्हणून उल्लेख केला होता. याला नारायण राणे यांचे सपुत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राज्यात काहीजणांना माणसांची इंजेक्शन्स लागू पडत नाहीत. त्यांना गुराढोरांची इंजेक्शन्स लागतात. गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पिल्लं शिवसेनेविरोधात ओरडत फिरत आहेत, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून केली होती. यावर नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यामातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. “बिहारच्या अगोदरच पक्षप्रमुखानी “Vaccine” घेतलेली दिसते. जास्तच हवा भरलेली आज, किती आव, ‘टाचणी’ तैयार आहे.. फक्त योग्य वेळ येऊन द्या,” अशी टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर केली. दुसऱ्यांची 'पिल्ल' वाईट.. मग यांनी काय त्या DINO च्या खुशित नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा "श्रवणबाळ" जन्माला घातला आहे का? इतकी खुम खुमी आहे ना मग ती Disha Salain ची केस मुंबई पुलिस वर कुठला ही दबाव न टाकता निपक्षपाती चौकशी करुन दया..मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते! अशा अशायाचे ट्विट त्यांनी केले आहे. हे देखील वाचा- Gopinath Gad Dasara Melava 2020: माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला गेला, पण मला चक्रव्यूहत जायचे आणि बाहेर यायचेही माहित आहे; पंकजा मुंडे
नितेश राणे यांचे ट्विट-
बिहार च्या अगोदरच पक्षप्रमुखानी “Vaccine” घेतलेली दिसते..
जास्तच हवा भरलेली आज..
किती आव..
'टाचणी’ तैयार आहे..
फक्त योग्य वेळ येऊन दया..
— nitesh rane (@NiteshNRane) October 25, 2020
दरवर्षी शिवाजी पार्कमध्ये होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात अगदी 50 जणांच्या उपस्थितीत पार पडला. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाआधी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. शाहीर नंदेश उमप यांच्या पोवाड्याने या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील उपस्थिती लावली होती.