पुण्यातील (Pune) कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर काही कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यावरुन राज्याचे अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी टीका केली आहे. पुण्यासारखं जागतिक शहर 50 टक्के बंद ठेवणं हा तेथील लोकांवर अन्याय असून महाराष्ट्रासाठी हे पोषक नसल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे. तसंच या निर्णयावरुन अर्थमंत्र्यांना अर्थव्यवस्थेतलं काही कळत नसल्याचे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
निलेश राणे यांनी ट्विटमध्ये लिहिले, "अर्थमंत्र्यांनी पुण्यामध्ये जिथे ते पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी लॉकडाऊन करून दाखऊन दिलं की त्यांना अर्थव्यवस्थेबद्दल काहीच कळत नाही. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी पुण्यासारख्या एक जागतिक शहराला ५० टक्के बंद ठेवणं हे तिकडच्या लोकांवर अन्याय आहे व महाराष्ट्रसाठी पोषक नाही."
Nilesh Rane Tweet:
अर्थमंत्र्यांनी पुण्यामध्ये जिथे ते पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी लॉकडाऊन करून दाखऊन दिलं की त्यांना अर्थव्यवस्थेबद्दल काहीच कळत नाही. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी पुण्यासारख्या एक जागतिक शहराला ५० टक्के बंद ठेवणं हे तिकडच्या लोकांवर अन्याय आहे व महाराष्ट्रसाठी पोषक नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 2, 2021
पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सायंकाळी 6 ते सकाळी 6 या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर 3 एप्रिलपासून हॉटेल, बार, रेस्टॉरंट सह पीएमपीएमएल बससेवा पुढील 7 दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, यापूर्वी देखील लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन निलेश राणे यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले होते. लॉकडाऊन महाराष्ट्राला परवडणार नाही, हे अजित पवार यांनी अर्थमंत्र्यांच्या नात्याने मुख्यमंत्र्यांना सांगायला हवे, असे ते म्हणाले होते.