Eknath Khadse On Devendra Fadnavis: 'आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते' भाजप नेते एकनाथ खडसे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र
Eknath Khadse | (Photo Credits: Facebook)

जेष्ठ भाजप (BJP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा एकदा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. आपल्याला झालेल्या त्रासावर ‘नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान’(Nanaji Fadnavis Yanche Barbhai karasthan,) हे पुस्तक आपण लवकरच लिहाणीर आहेत असे सांगत आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर (Dry Cleaner CM) होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना ही क्लिन चिट कधी मिळाली नाही, अशी खंतही एकनाथ खडसे यांनी या वेळी बोलून दाखवली. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आपल्याला त्रास झाला म्हणून बोलतो आहे, असेही खडसे या वेळी म्हणाले.

एकनाथ खडसे यांच्या जीवनावरील सुनील नेवे लिखित पुस्तकाचं आज प्रकाशन झाले. या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात खडसे बोलत होते. या वेळी एकनाथ खडसे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची नाराजी थेट बोलून दाखवली. आपण पक्षाच्या विरोधात बोलणार नाही. परंतू, आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल बोलणार असे सांगत खडसे म्हणाले, सगळेच सांगतात नाथाभाऊ चांगले. पण नाथाभाऊ चांगले तर मग नाथाभाऊंना तिकीट का नाही दिलं? मी मुख्यमंत्री होऊ शकलो नाही. याचे मला दु:ख नाही. या आधीही उत्तर महाराष्ट्राला कधीही मुख्यमंत्री पद मिळाले नाही. परंतू, माझ्यावर अन्याय झाला हे खरं आहे. (हेही वाचा, Eknath Khadse On BJP Leadership: बहुजनांना डावलण्याच्या नेतृत्वाच्या वृत्तीमुळे भाजपची सत्ता गेली- एकनाथ खडसे)

पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का?. नाथाभाऊ हा अन्याय सहन करणाऱ्यांपैकी मुळीच नाही. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही. तोपर्यंत आपण स्वस्त बसणार नाही. आपण पक्षाच्या विरोधात बोलणार नाही. परंतू, न्याय मिळेपर्यंत पक्षाला प्रश्न विचारत राहणार असेही खडसे यांनी ठासून सागितले. . (हेही वाचा, 'मी पुन्हा येईन हे जनतेला आवडले की नाही? याचा शोध घेईन' असे म्हणत भाजप नेते एकनाथ खडसे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला)

दरम्यान, आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल आपण ‘नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान’ हे पुस्तक लवकरच लिहिणार आहोत, अशी घोषणाही एकनाथ खडसे यांनी या कार्यक्रमात केली. चार-दोन राजे लाचार झाले आणि इंग्रजांना मिळाले तसाच हा कार्यक्रम आहे. माझ्यावर दाऊदशी संबंध असलेल्याचे आरोप करणाऱ्या मनीष भंगाळे याला सन्मानाची वागणूक मिळते. आपल्याकडे याबाबतचे पुरावे आले आहेत. या पुस्तकात आपण हे सगळे लिहिणार आहोत, असेही खडसे म्हणाले.