देवेंद्र फडणवीस यांना उमगली चूक, व्यक्त केली दिलगिरी; शाहू महाराज यांच्याबद्द केले होते आक्षेपार्ह ट्विट
Devendra Fadnavis | (Photo Credits: Facebook)

Devendra Fadnavis Apologize: विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी लागली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या ट्विटबद्दल माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्रातून केली जात होती. मात्र, फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त करत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. राजर्षी शाहू महाराजांबद्दलच्या 'त्या' ट्विटबद्दल (जे त्यांनी नंतर डिलिट केले) आज एक नवे ट्विट करत 'शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही' असे म्हणत दिलगिरी व्यक्त केली.

राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांची काल (6 मे 2020) स्मृतीदिन होता. या पुण्यतिथीनिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट करत शाहू महाराज यांचे स्मरण केले होते. मात्र, ते करत असताना त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांचा उल्लेख 'सामाजिक कार्यकर्ते' असा केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या या ट्विटनंतर महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. यात राजर्षी शाहूप्रेमी आणि त्यांच्या विचारांवर श्रद्धा असलेल्यांचा समावेश अधिक होता. प्रचंड टीका झाल्यावर फडणवीस यांना वेळीच आपली चूक उमगली आणि त्यांनी ते ट्विट डिलीट केले.

ट्विट

ट्विट

दरम्यान, कालच्या ट्विटबद्दल आज नवे ट्विट करत फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली. आपल्या ट्विटमध्ये फडणवीस यांनी म्हटले आहे की ''छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.''

Screenshot of Devendra Fadnavis's tweet which is he later deleted

भाजपा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या या कृतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांनी शिव-शाहू भक्तांची माफी मागावी अशी मागणी करणारे ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते की ''माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या संपूर्ण प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.'' (हेही वाचा, Rajarshi Shahu Maharaj Chhatrapati Death Anniversary 2020: राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी HD Images, Wallpapers)

ट्विट

दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करीत “संघाच्या मनुवादी विचारांच्या मुशीतून आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराजांना कार्यकर्ता म्हणून कमी लेखन आश्चर्यकारक नाही. संघानं मनुवाद आणायचा असल्यानं महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कायम आकस केला. मनातील भावना बाहेर आली एवढेच! जाहीर निषेध!,” असं ट्विटरद्वारे म्हटले होते.