Chitra Wagh | (Photo Credits-Facebook)

मुंबई पोलीस दलातील माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसूलीचा आरोप करत पत्र जाहीर केले होते. त्यासंदर्भातच आज हायकोर्टाने सुनावणी करत या प्रकरणी सीबीआयच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभुमीवर अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे आता विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला जात आहे. तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या संदर्भात ट्विट करत असे म्हटले आहे की, अखेर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला.(Anil Deshmukh यांच्या गृहमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर कोण होऊ शकतं नवे गृहमंत्री? हसन मुश्रीफ, दिलिप वळसे पाटील यांच्यासह ही नावं चर्चेत!)

पुढे वाघ यांनी ट्विटमध्ये असे ही म्हटले की, मात्र आता प्रश्न असा उपस्थितीत राहतो की नवा वसुली मंत्री कोण? तसेच मंत्रिमंडळातील एखादा चेहरा बदलल्याने सरकारचा भ्रष्टाचार करण्याचा हेतू काही बदला जाणार नाही अशी सुद्धा टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.('भाजपाच्या आणखी एका लढ्याला यश'; गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षाने अधिकृत ट्विटर पेजवर केले 'हे' खास ट्विट) 

Tweet:

दरम्यान, अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी "या सरकारकडे नैतिकता शिल्लक आहे का हे विचारावं लागेल," असे पत्रकार परिषदेत म्हणाले. हा राजीनामा झाला असला तरी अजूनही एका गोष्टीचं कोडं मला पडलं आहे. इतक्या भयावह घटना राज्यात झाले. कधी नव्हे तेवढे आरोप मंत्र्यांवर लागले. मात्र, अजूनही मुख्यमंत्री अजूनही बोलत नाहीतेय. अजूनही मुख्यमंत्री शांत आहेत. हे अस्वस्थ करणारं आहे. त्यांची प्रतिक्रिया यायला हवी होती. असेही ते पुढे म्हणाले.