Gatari Amavasya 2023: श्रावण महिना सुरु होण्याआधी दीप अमावस्या गटारी (Gatari) जोरदार पध्दतीने साजरी केली जाते. नॉनव्हेजच्या विविध मेजवानीवर लोक ताव मारतात. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या (BJP) वतीने हटके पोस्टर लावण्यात आलेले आहे. सद्या सोशल मीडियावर या पोस्टरची चर्चा रंगली आहे. गटारीनिमित्त मुंबईमध्ये (Mumbai) भाजपने शनिवारी थेट कोंबड्यांच्या वाटपाचा कार्यक्रमच आयोजित केला होता. कोंबडी वाटपाच्या या कार्यक्रमाचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गटारी अमावस्येनिमित्त भाजपाकडून मुंबईत मोफत कोंबडी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला आहे. मुंबईतील प्रभादेवी नाक्यावर स्थानिकांना मोफत कोंबड्याच वाटप केलं. या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो ही पोस्टरवर झळकलेला आहे. मुंबई भाजपचे पदाधिकारी बबन तोडणकर आणि चेतन देवळेकर यांच्याकडून कोंबडी वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये अनेक राजकिय नेते पाहायला मिळत आहे त्याच सोबत दीप अमावस्येनिमीत्त मोफत कोंबडी वाटप असा आशय दिसून येत आहे.
सोशल मीडियावर अनेक युजर्सने या पोस्टरच्या पोस्टवर गंमतीशीर कंमेट देखील केल्या आहे. राजकिय नेते सचिन शिंदे यांनी हे पोस्टर लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. सचिन शिंदे यांनी या प्रकरणात भाष्य केले आहे. कुणीतरी खोडसाळपणानं फोटोचा गैरवापर करून बॅनर लावल्याचे सांगितले. लवकरच बॅनर लावणाऱ्यावर कारवाई केली जाईल. पक्षाचं बदनामी केल्याचं प्रयत्न केला जात आहे. असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.