भाजप जन आशीर्वाद यात्रा (BJP Jan Ashirwad Yatra) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या नेतृत्वात आज (19 ऑगस्ट) पासून सुरु झाली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास नारायण राणे यांचे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर आगमन झाले. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला हार अर्पण करुन त्यांनी यात्रेला केली. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासह भाजपाचे राज्यातील प्रमुख नेतेमंडळींनी राणे यांचे या वेळी स्वागत केले. तिथूनच नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेस सुरुवात केली. या वेळी भाजप कार्यकर्त्यांना संबोधीत करताना राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडी सरकारवर टीका केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नावाप्रमाणेच महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. त्यामुळे राज्यातील जनताच आता भाजपची सत्ता यावी यासाठी आशेचा किरण ठेऊन आहे. त्यामुळेच जन आशीर्वाद यात्रेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे राणे म्हणाले. (हेही वाचा, Jan Ashirwad Yatra: 16 ऑगस्ट पासून सुरु होणार मोदी सरकारच्या नव्या मंत्र्यांची 'जन आशीर्वाद यात्रा'; 22 राज्यात पूर्ण करणार 20,000 किमीचे अंतर )
ट्विट
केंद्रीय मंत्री @MeNarayanRane यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून जन आशीर्वाद यात्रेला केला प्रारंभ.
यावेळी विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis भाजपा मुंबई अध्यक्ष @MPLodha तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #JanAshirwadYatra pic.twitter.com/8gdHnEn5IQ
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) August 19, 2021
राणे यांनी आपल्या पहिल्याच भाषणात 'महाराष्ट्राने आपल्याला खूप दिले. त्यामुळेच आपला केंद्रात जाण्याचा मार्ग मोकळा झाला' असे सांगतानाच केंद्रात मंत्रिपद दिल्याबद्दल राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने मी केंद्रात मंत्री झालो. त्यामुळे मी मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी आहे. कारण त्यांनीच मला केंद्रात मंत्रिमंडळात संधी उपलब्ध करुन दिली, असेही राणे म्हणाले.
ट्विट
केंद्रीय मंत्री @MeNarayanRane यांच्या जन आशीर्वाद यात्रेला प्रारंभ #JanAshirwadYatra pic.twitter.com/ayIhWeVB52
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) August 19, 2021
दरम्यान, जन आशीर्वाद यात्रेला हिरवा झेंडा दाखवताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच बहुजनांची सत्ता पाहायला मिळत आहे. देशातील कर्तृत्ववान लोकांना पंतप्रधान मोदी यांनी निवडून घेतले आहे. त्या लोकांमध्ये नारायण राणे यांना महत्त्वाची जबाबदारी मिळाली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.