Pooja Chavan Suicide Case: भाजप कार्यकर्त्यांकडून कळंबोली येथे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग रोखण्याचा प्रयत्न; महापौरांसहीत 35 आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
Pooja Chavan Suicide Case (Photo Credit: Twitter)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे (Pooja Chavan Suicide Case) महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. याप्रकरणाशी महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांचा संबंध असल्याचा दावा करत भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, संजय राठोड यांच्यावर ठाकरे सरकारने काहीच कारवाई न केल्याबद्दल भाजपने आज पनवेलमध्ये (Panvel) आंदोलन केले आहे. पनवेल महानगरपालिकेच्या महापौर कविता चौतमोल (Kavita Chautmol) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये कळंबोली येथे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ( Mumbai-Pune Expressway) वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच धाव घेत महापौरांसहीत 35 आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

पूजा चव्हाण मृत्युप्रकरणी संजय राठोड यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी करत महापौर कविता चौतमोल यांच्यासह सभापती मोनिका महानवर आणि इतर नगरसेविकांसहीत भाजपाच्या अनेक महिला कार्यकर्त्यांनी आज कळंबोली येथे आंदोलन केली. त्यावेळी आंदोलकांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. यासंदर्भात माहिती मिळताच कळंबोली पोलिसांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी महापौर चौतमोल यांच्यासह 35 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. हे देखील वाचा- भाजप नेत्या Chitra Wagh यांचे पती Kishor Wagh यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल

तसेच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील राज्य सरकारला जाहीर आव्हान दिले आहे. "राज्यात येत्या सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. याआधीच राज्य सरकारने संजय राठोड यांचा राजिनामा घेतला नाही किंवा त्यांची चौकशी केली नाहीतर, सभागृह चालू देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.