एकीकडे कोरोना संकटाचा सामना करणार्या बीएमसीसमोर आता बर्ड फ्लूचं (Bird Flu) देखील सावट उभं ठाकलं आहे. मुंबई, ठाणे शहरासह महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने बीएमसी (BMC) पुन्हा अलर्ट झाली आहे. नुकताच बीएमसीने बर्ड फ्लूचा फैलाव रोखण्यासाठी नवा अॅक्शन प्लॅन आखला आहे. सध्या कावळे, बगळे, कोंबड्यांसह अनेक पक्षांच्या मृत्यूमध्ये वाढ झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बीएमसीने मुंबईकरांना मृत पक्षी आढळल्यास त्याची बीएमसीला माहिती द्यावी असं आवाहन केले आहे. यासाठी 1916 वर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. Bird Flu: भारतात बऱ्याचदा बर्ड फ्लू चा आजार येतो कसा? जाणून घ्या कारण.
1916 या हेल्पलाईन नंबर वर माहिती दिल्यानंतर पालिकेचे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे कर्मचारी मृत पक्षांची विल्हेवाट लावणार आहेत. बीएमसीने जारी केलेल्या परिपत्रकामध्ये मृत पक्षांची विल्हेवाट लावण्यापूर्वी त्याची माहिती पालिकेला पशुसंवर्धन विभागाला देणं गरजेचे आहे. मृत पक्षांना अशाप्रकारे गाढलं जाईल की त्याला इतर पक्षी किंवा प्राणी खाऊ शकणार नाहीत. त्यामुळे वायरसचा संसर्ग रोखण्यात मदत होणार आहे. (Bird Flu: एवियन फ्लू चा धोका! जाणून घ्या काय आहेत बर्ड फ्लूची लक्षणे, कारणे, उपचार आणि कशाप्रकारे करू शकाल बचाव).
बर्ड फ्लू या रोगाचा प्रादुर्भाव थांबविण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेला सहकार्य करा.
पक्ष्यांच्या मृत्यूबाबत आम्हाला १९१६ या क्रमांकावर त्वरित कळवा.#BirdFlu #Dial1916 pic.twitter.com/t4XnpAKuqd
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 14, 2021
लवकरच बीएमसीकडून पालिका हद्दीतील पॉल्ट्री व्यावसायिकांसाठी नवी नियमावली जाहीर केली जाणार आहे. यामध्ये अंड आणि चिकन विक्रेत्यांसाठी एसओपी असेल. राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असला तरीही त्यामध्ये अद्याप मांसाहारावर बंदी घालण्यात आलेली नाही. नीट शिजवलेला मांसाहार, अंडी बर्ड फ्लूचा धोका पसरवू शकत नाही. त्यामुळे विनाकारण अफवा न पसरवण्याचं तसेच खोट्या वृत्तांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.