Bird Flu: देशासह राज्यातील विविध जिल्ह्यात कोरोनाच्या परिस्थितीतच आता बर्ड फ्लू ने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पोल्ट्री फार्मवर बंदी घालण्यासह बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव अधिक पसरु नये म्हणून कोंबड्यांना ठार मारले जात आहेत. याच दरम्यान आता सातारा मधील खंडाळा येथे बर्ड फ्लू मुळे कोंबड्यांच्या मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. मरिआईची वाडी गावात ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पाळीव आणि पोल्ट्री धारक कोंबड्यांची आता तपासणी सुरु करण्यात आली आहे.(भारतात 14 राज्यात Bird Flu चा कहर; लाल किल्ल्यात मृत सापडलेल्या 15 कावळ्यांना संक्रमण, 26 जानेवारीपर्यंत प्रवेश बंदी)
गावात काही कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे अहवाल पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्या संदर्भात आता अहवाल समोर आले असून त्यांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. याच कारणास्तव जिल्ह्याधिकाऱ्यांनी सतर्कता म्हणून जवळजवळ 1 किमी पर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच वाहतूक पूर्णपणे थांबण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
या परिसरातील पोल्ट्री व्यवसाय, पाळीव पक्षी त्यांची वाहतूक करता येणार नाही. त्यामुळे या परिसरात आता फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. मृत कोंबड्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट प्रशासकीय यंत्रणेद्वारे लावली जाणार आहे. एकंदरितच बर्ड फ्लू मुळे साताऱ्यातील पोल्ट्रीचे मालक समस्येत सापडले आहेत.(Bird Flu FAQs: अंडी आणि चिकन खाणे सुरक्षित आहे का? Avian Influenza धोका माणसाला किती? जाणून घ्या बर्ड फ्लू संसर्गामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे)
राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात असून भीती नको, काळजी घ्या, या विषाणूचा प्रसार कुक्कुट पक्ष्यांचे मांस, अंडी किंवा मासे यांच्यामार्फत होत नाही. मांस, अंडी व मासे खाऊ शकतात, अशी माहिती पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली. समाजमाध्यमे व इतर प्रसिद्धी माध्यमातून प्रसारीत होणाऱ्या अफवा व अकारण भीती पसरविणाऱ्या बातम्यांपासून सावध राहा, असे आवाहनही मंत्री श्री. केदार यांनी केले आहे.