BMC to procure 1 lakh Rapid Test Kits for COVID19 | Representational Image | (Photo Credits: IANS)

कोरोना विषाणूचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) पसरत चालेले आहे. यातच कोरोनाबाधीत रुग्णांच्या प्रकृतीतही सुधारणा होऊ लागली आहे. लातूर (Latur) शहरात गेल्या काही दिवसात एकाच वेळी 8 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, निलंग्यातील सर्व दुकाने, किराणा, भाजीपाला, फळे, दूधविक्री बंद राहील यांची नोंद घ्यावी त्याच बरोबर फक्त अत्यावश्यक कारणासाठीच नगर परिषदेशी संपर्क साधावा, असे निलंग्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी नागरिकांना सांगितले होते.मात्र, गेल्या 48 तासातील दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याने लातूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबतची माहिती लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी ट्वीट करून दिली आहे.

भारतात आतापर्यंत एकूण 15 हजार 712 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 507 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 हजार 231 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 3 हजार 648 वर पोहचली आहे. यापैंकी 211 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 365 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- नागपूर: Coronavirus Lockdown दरम्यान नागरिकांमध्ये जागतिक आरोग्य संकटाबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी उभारला कोरोनाचा प्रतिकात्मक पुतळा

अमित देशमुख यांचे ट्विट-

आंध्रप्रदेश येथील करनुल भागातील बाराजण हे जमातसाठी पंधरा डिसेंबरला निघाले होते. आंध्रप्रदेश आणि हरियाणा या राज्यात धार्मिक कामे केल्यानंतर ते करनुलकडे निघणार होते. त्यातच लॉकडाऊनची घोषणा झाली. त्यांच्या रेल्वेचे तिकीट आरक्षित होते. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांना काहीच करता आले नाही. हरियाणा येथील प्रशासनास कळवून त्यांनी पुढील प्रवास सुरु केला. तेथील तहसीलदार यांनी दिलेल्या पासवर खासगी गाडीतून मथुरा आग्रा, इंदोर, धुळे, औरंगाबाद, उस्मानाबाद, तुळजापूर या मार्गे ते निलंगा येथे आले. निलंगा येथे एक एप्रिलला ते दाखल झाले. त्यांनी करनुलच्या वैद्यकीय सेंटरला जाण्यासाठी मदत करा असे प्रशासनास सांगितले. लातूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्यातील आठ लोकांना कोरोनाची लक्षणे आढळून आली होती.