महाराष्ट्रामध्ये दिवसागणिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. दरम्यान कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सरकारने कडक संचारबंदीचे आदेश दिले आहेत. मात्र तरीही नागरिक रस्त्यावर अनावश्यक गर्दी करत असल्याने आता पोलिसांनी चक्क कोरोना व्हायरसचा प्रतिकात्मक पुतळा उभारत नागरिकांना घरी बसण्याचं आवाहन केलं आहे. नागपूरच्या शांती नगर भागात पोलिसांनी हा पुतळा उभारला आहे. दरम्यान आज (19 एप्रिल) नागपुरमध्ये 9 नवे रूग्ण आढळल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 72 वर पोहचला आहे.
दरम्यान नागरिकांना कोरोना व्हायरस संकटांचं गांभीर्य समजावं, त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणं का गरजेचे आहे? यासाठी सरकारसोबतच अनेक सेलिब्रिटींच्या माध्यमातून जनजागृतीचं काम सुरू आहे. पोलिसही कुठे यमराज बनून तर कुठे डोक्यामध्ये कोरोना व्हायरसच्या प्रतिकृतीचं हेल्मेट घालुन नागरिकांना घरीच बसण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. समाजात जनजागृती निर्माण होऊन लोकांनी घरीच बसण्याचं महत्त्व ओळखावं यासाठी नागपूरमध्येही पोलिसांकडून नामी शक्कल लढवण्यात आली आहे. Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्र पोलिस खात्यातील 8 अधिकारी तर 29 अन्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात.
ANI Tweet
Maharashtra: Police puts up a #COVID themed effigy near Shanti Nagar in Nagpur to spread awareness regarding the precautionary measures to be taken amid the #coronavirus outbreak. Total number of #COVID19 positive cases in the district stand at 72. pic.twitter.com/5IKLeBcZIE
— ANI (@ANI) April 19, 2020
भारतातील सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. प्रामुख्याने मुंबई, पुणे, नागपुर मध्ये कोरोनाबाधित रूग्ण असल्याने आता सरकारकडूनही कोरोना रोखण्यासाठी चाचण्या वाढवल्या जात आहेत. औषधोपचार पद्धतीमध्ये बदल करत अधिकाधिक रूग्णांना जीवनदान मिळावं म्हणून प्रयत्न केले जात आहेत. राज्यात सध्या एकूण 3648 कोरोना बाधित रुग्ण असून 365 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 211जणांचा बळी गेला आहे.