Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mahayuti Seat Sharing Formula: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, त्याआधीच राज्यात राजकीय खलबते वाढत आहेत. जागावाटपावरून महायुती (Mahayuti) मध्ये सुरू असलेल्या राजकीय गदारोळात एक मोठी बातमी समोर आली आहे. 15 ऑगस्टपर्यंत महायुतीच्या विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला (Mahayuti Seat Sharing Formula) ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले की, या फॉर्म्युल्याअंतर्गत ज्या जागांवर पक्षांचे आमदार विजयी झाले आहेत, त्या जागांवर सिटिंग गेटिंगचा फॉर्म्युला (Setting Getting Formula) ठरविण्यात आला आहे. ज्या पक्षांचे आमदार निवडून आले आहेत, त्या पक्षांचेच उमेदवार निवडणूक लढवतील. (हेही वाचा - Maharashtra Assembly Election 2024: प्रशासनात एकत्र, राजकारणात स्वतंत्र! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी BJP, Shiv Sena आणि NCP (AP) काढणार वेगवेगळ्या यात्रा)

अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रत्येक आमदाराला आपण सिटींग आहोत असे वाटते, मग ते भाजपचे असोत, शिंदेजींचे असोत, अजित पवारांचे असोत. हे पाहता आमदारांच्या त्या भावनेचा आम्ही आदर करतो. ही भावना पक्की आहे. यात केवळ एक किंवा दोन जागा इकडे-तिकडे होऊ शकतात. (हेही वाचा -Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्र विधानसभेसाठी कॉंग्रेस 20 ऑगस्टपासून करणार निवडणूक प्रचाराला सुरुवात; जागावाटपाबद्दल चर्चा सुरु)

15 ऑगस्ट रोजी होणार निर्णय -

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, सिटिंग गेटिंगबाबत आमदारांच्या भावनेचा विषय असून, युतीबाबत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. जागावाटपाबाबत संपूर्ण निर्णय 15 ऑगस्टपर्यंत घेतला जाईल. आमदारांची मानसिकता आहे आहे की, जिथे जे विजयी झाले आहेत, तेथूनचं त्यांनी पुन्हा निवडणूक लढवावी. यात काही जागा इकडे-तिकडे होतील. पण हीच भावना सर्व आमदार आणि पक्षाची आहे. याची अंमलबजावणी करता येईल, असंही यावेळी बावनकुळे यांनी सांगितलं.