राज्यातील अभूतपूर्व सत्तेच्या खेळानंतर शिवसेनेतील (Shivsena) अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील गटात दाखल झाले आहेत. आतापर्यंत शिवसेनेला धक्का देणाऱ्या शिंदे गटाने आता थेट राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) धक्का दिला आहे. सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नवी मुंबईतील पनवेल, उरण आणि खारघरमधील अनेक मनसे कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने नवी मुंबईचे मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांचा समावेश आहे. गेल्या आठ वर्षांपासून नवी मुंबईत जिल्हाध्यक्षपद भूषविलेल्या अतुल भगत यांनी सहकाऱ्यांसह एकनाथ शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.
भगत यांच्यासह मनसेचे 65 हून अधिक आजी-माजी पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले. या प्रवेशासोबतच नवी मुंबईत मनसेतील अंतर्गत भ्रष्टाचार उघडकीस आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भगत यांच्यासह नवी मुंबई उपतालुका अध्यक्षांसह अन्य पदाधिकारीही शिंदे गटात दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हे सर्वजण शिंदे गटात दाखल झाले. एकनाथ शिंदे यांनी भगत यांना भगवा झेंडा देऊन त्यांचे आपल्या गटात स्वागत केले. हेही वाचा Shiv Sainiks Vs Shinde Camp: उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक विरुद्ध एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये डोंबिवली शाखेत राडा
त्यामुळे या सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना गणपतीची मूर्ती भेट दिली. मनसेने शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिल्यानंतरही पदाधिकारी शिंदे गटात सामील होत असल्याने पक्षांतर्गत वादातून हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा नवी मुंबईत आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या या प्रवेशामुळे शिंदे गट आणि मनसेमध्ये वाद होण्याची शक्यताही स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली आहे. राज्यात सत्तांतर घडवून आणणाऱ्या बंडाचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
ठाणे महापालिकेत शिवसेनेच्या 67 पैकी 66, नवी मुंबई महापालिकेत 38 पैकी 28 जणांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. महिनाभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन निवासस्थानी भेट घेऊन नवी मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या 38 पैकी 28 माजी नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला होता.