Uddhav Thackeray (Photo Credits: CMO Maharashtra)

भूमिपुत्रांनो ग्रीन झोनमधल्या (Green Zone)उद्योगांमध्ये सामील व्हा, असं आवाहन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठी तरुण उद्योजकांना (Young Marathi Entrepreneurs) केलं आहे. महाराष्ट्राला पुन्हा एकदा उभं करण्यासाठी सहकार्य करा. तुमच्या सहकार्याने महाराष्ट्र पुन्हा पहिल्यासारखा होईल. मी माझा महाराष्ट्र पुन्हा उभा करणार, या निश्चियाने बाहेर पडा. ग्रीन झोनमध्ये मजूर कमी पडल्यास त्याठिकाणी भूमिपुत्रांची गरज आहे. महाराष्ट्र आत्मनिर्भर करण्यासाठी मी पुढाकार घेत आहे, हे तरुणांनी देशाला दाखवावे, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

लॉकडाऊनमुळे कामगार परराज्यात गेले आहेत. त्यामुळे आता भूमिपुत्रांनी ग्रीन झोनमध्ये आत्मनिश्चयाने बाहेर पडा आणि महाराष्ट्राला वाचवण्याचा निर्धार करा, असं आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन काळावधी 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. आजपासून लॉकडाऊन 4 ची सुरुवात झाली आहे. याचं पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील ग्रीन झोनमधील भूमिपुत्रांना महाराष्ट्रासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. (हेही वाचा - Coronavirus: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी साधला संवाद)

आपल्यासमोर दोन मोठी आवाहन आहेत. ग्रीन झोन कोरोना विरहित ठेवायचा आहे. तर तर दुसरं आवाहन म्हणजे रेड झोनला ग्रीन झोन करणे. ग्रीन झोमध्ये एकही रुग्ण वाढू द्यायचा नाही आणि रेड झोन ग्रीनमध्ये आणायचा आहे. प्रदुषण न करणाऱ्या उद्योगांना कोणतीही अट घालण्यात येणार नाही. तसेच नव्या उद्योजकांना भाडेतत्वावर जमीन देण्यात येणार असून त्यांच्यासाठी 40 हजार एकर जमीन राखीव ठेवण्यात येणार आहे.

आपल्याला भरारी घ्यायची आहे. आपण ती नक्की घेऊ. आजपर्यंत आपण 50 हजार उद्योग सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामध्ये साधारण 5 लाख कामगार काम करत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. मात्र, जर लॉकडाऊन केलं नसतं हे आकडे जास्त असते. युद्ध शस्त्राने लढतात, पण या युद्धात शस्त्र नाही, सोशल डिस्टन्सिंग हेच शस्त्र आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.