Uddhav Thackeray (Photo Credits: CMO Maharashtra)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज रात्री 8. 30 वाजता राज्यातील जनतेला संबोधित केले आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा घोषीत करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय संदेश देणार आहेत? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यामातून राज्यातील नागरिकांशी संवाद साधला आहे. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकार काय उपाय योजना राबवल्या जात आहेत, यावरही चर्चा केली आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यातून राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. दरम्यान्, उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदची बिनविरोध निवडणूक लढवल्याबद्दल उद्धव ठाकरेल यांनी सर्वप्रथम सर्व सदस्यांचे आभार मानले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात 50 लाख उद्योगांना सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर, 70 लाखांहून अधिक मजूर कामावर रजू आहेत. तसेच हळूहळू ग्रीन झोनमधील नियमांना शिथिलता देण्यात येईल. मात्र, रेड झोनमधील निर्बंध कायम राहतील, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा-  हे देखील वाचा- महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वांद्रे कुर्ला संकुलनातील एमएमआरडी येथे उभारण्यात येणाऱ्या कोविड19 च्या रुग्णालयाला भेट

उद्धव ठाकरे यांचे फेसबूक लाईव्ह-

महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट वावरत असताना 40 हजारांपेक्षा अधिक जमीन उद्योगासाठी राखून ठेवली आहे. तसेच ग्रीन झोनमधील भुमिपुत्रांनो पुढे, आत्मनिर्भर व्हा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी उद्योकांना आवाहन केले आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात आसीयू बेड्सची उपलब्धता करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. महत्वाचे म्हणजे, ज्या लोकांना कोरोना विरोधात लढण्याची इच्छा आहे, त्यांनी स्वत:हून पुढे यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे राज्यातील नागरिकांना केले आहे.